नंदू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन !!
डोंबिवली, बातमीदार : डोंबिवली ग्रामीण मंडळ चे भाजपाचे अध्यक्ष नंदू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक 26 जून रोजी ग्रामीण मंडळ कार्यालय गणपती मंदिर जवळ मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये एस जी आय हॉस्पिटल तर्फे मोतीबिंदू, रेटीना पडदा, कॉर्निया, काचबिंदू, तिरळेपणा, ऑक्यूलोप्लास्टि अशी अनेक तपासण्या यावेळी नंदू परब यांच्या माध्यमातून नागरिकांन साठी ठेवण्यात आल्या. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
नंदू परब नेहमीच आपल्या प्रभागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात.दर आठवड्याला नागरिकांसाठी मोफत असे अनेक शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावेळी डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, सरचिटणीस सूर्यकांत माळकर, वार्ड अध्यक्ष संतोष शुक्ला, नगरसेवक विनोद पाटील, कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा रसिका पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण..
No comments:
Post a Comment