Saturday, 9 July 2022

मासेमारी साठी गेला आणि प्राणाला मुकला !! ** पाठगाव बाटली वाडी येथील आदिवासी तरुणाचा दुदैवी म्रुत्यु !! **

मासेमारी साठी गेला आणि प्राणाला मुकला !! ** पाठगाव बाटली वाडी येथील आदिवासी तरुणाचा दुदैवी म्रुत्यु !! **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आदिवासींना बाराही महिने काहीना काही कामे करून आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करावे लागते. त्यात पावसाळ्यात जंगली भाज्या,शेवळी, तेलपाट, चायवळ, मोदु-या, लोत ह्या विकुन रोजचे जीवनमान चालवावे लागते.त्यात जोरदार पाऊस झाला. नद्या नाले वाहु लागताच वलगन लागली, कि हि लोकं मासेमारी कडे जास्त लक्ष देतात. त्यातून जरा दोन पैसे जास्त मिळतात. मात्र हिच मासेमारी कधी कधी जिवाला काळ ठरते आणि कुंटुंब प्रमुखाला घेऊन जाते. काही क्षणातच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. असाच प्रकार मुरबाड तालुक्यातील म्हसा गावाशेजारील पाटगाव - बाटली वाडी, येथील तरुणाच्या बाबतीत घडला आहे. सदर तरुण बुधवारी मासेमारी साठी गेला होता. एका फार्महाऊस वाल्यांनी बांधलेल्या के.टी. बंधाऱ्यावर मासेमारी करत असताना तो जाळ्यात अडकून बुडाला आणि त्याचा दुर्दैवी म्रुत्यु झाला. चंद्रकांत पालो खंडवी असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असुन, मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार, विजय चतूरे व रामा शिंदे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे *कोकण, बातमीदार : स्वतंत्र कोकण राज्य अभियाना...