मुरबाड पोलिसांच्या रिंग राऊंडला पुन्हा एकदा भले मोठे यश !!
**निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतून ५ लाखाचा मुद्देमाल व १० लाख किमतीचा आयशर टेम्पो चोरून घेवून जाणारा आरोपी मुद्देमालासह पकडला **
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
दोन दिवसांपूर्वीच मुरबाड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, दि १९/०७/२०२२ ते २०/०७/२०२२ चे रात्री मुरबाड पोलिसांच्या रिंग राउंड गुन्हे प्रतिबंधक गस्तीस पुन्हा एकदा भले मोठे यश मिळाले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतून ५,५२,०००/ रुपये किमतीचे पॉलिस्टर धाग्याचे रिम रोल व १०,००,०००/ रुपये किमतीचा आयशर टेम्पो सह चोरी करून घेवून निघाले असता, सदर टेम्पो व चोरीस गेलेल्या मालासह एमआयडीसी (MIDC) मुरबाड रोडवर मुरबाड पोलिसांच्या रात्र रिंग राउंड पोलिसांना आढळल्याने संशय आल्याने हटकले असता, चालक भांबाऊंन गेला, तिथे उपस्थित राहण्याचे कारण, टेम्पो व टेम्पोतील मालाच्या मालकीचा पुरावा सांगू शकला नाही. त्यामुळे हा चोरीचा माल असल्याचा संशय बळावल्याने चालकासह टेम्पो व आतील माल पंचनामा करून ताब्यात घेतला व त्यांच्या वर CRPC कलम ४१(ड) अन्वये कारवाई केली. यात एकूण १५ लाख ५२ हजार रूपये किंमतिचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे पुढील चौकशीत असे उघडकीस आले कि, नमूद चोरट्याने सदर टेम्पो व आतील साहित्य निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतून चोरून घेवून जात होते. त्या बाबत निजामपुरा पोलीसांना माहिती देवून सर्व कागदोपत्री कायदेशीर पूर्तता करून आरोपी व जप्त टेम्पो व मुद्देमाल असा १५ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऐवज निजामपुरा पोलिसांच्या हवाली केला आहे.
मुरबाड पोलिसांच्या ह्या कारवाई मुळे चोरांचे धाबे दणाणले आहेत व मुरबाड हद्दीत चोऱ्या करण्याचे धाडस करण्यास ते आता धजावणार नाहीत....
सदरची कारवाई एपीआय (API) सोनोने, पीएसआय (PSI) तळेकर पो.हा. चमन शेख, डोईफ़ोडे, पो.ना. कैलास पाटील, जीवन पाटील, सचिन उदमले, चालक भगवान बांगर यांनी केली.
ह्या कारवाई मुळे मुरबाड पोलिसांची जनमानसातील विश्वासार्हता आणखीन वाढली आहे. सर्वत्र मुरबाड पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


Great job 👍
ReplyDelete