Monday, 11 July 2022

मनसे शहर सचिव गणेश नाईक यांचे केडीएमसी विरोधात उपोषण !

मनसे शहर सचिव गणेश नाईक यांचे केडीएमसी विरोधात उपोषण !


कल्याण, बातमीदार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर सचिव गणेश नाईक यांनी दिनांक ११ जुलै रोजी मिलिंद नगर, गौरीपाडा रस्ता कल्याण पश्चिम येथे केडीएमसी विरोधात उपोषणाला बसले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित प्रशासना विरोधात लक्षवेधी उपोषण यावेळी करण्यात आले. 
यावेळी शहर सचिव गणेश नाईक यांनी गेल्या ६ महिन्यांपासून वार्ड अधिकाऱ्यांकडे  पाठपुरावा केला होता. तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने  प्रशासनाला जाग यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर सचिव गणेश नाईक भर पावसात उपोषणाला बसले.

मिलिंद नगर, गौरीपाडा रस्त्याला तुंबलेली गटारे तळापर्यंत साफ करण्यात यावी, प्रभागातील बाह्य व अंतर्गत रस्त्याची डागडुगी करावी, कचऱ्याची नियमितपणे योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी, काही ठिकाणी गटाराला वरील झाकणे लावण्यात यावी, त्रिमूर्ती कॉलनी येथील आरोग्य केंद्र सुरू करावे. अशा अनेक समस्यांसाठी शहर सचिव गणेश नाईक हे उपोषणाला बसले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत वार्ड अधिकाऱ्यांकडे लगातार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येते. त्यांना जाग यावी म्हणून यावेळी घोषणाबाजी करत ‘इडा पिडा टळू दे, के डी एम सी चे आमच्याकडे लक्ष वळू दे’ अशी यावेळी घोषणा करण्यात आली. 

यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, महिला शहर अध्यक्ष शितल विखणकर, वासंती जाधव, अविनाश केणे, अर्चना चिंदरकर, शाखा अध्यक्ष दिलीप दादा गायकवाड, सतीश मोरे, सुनिल उतेकर, अब्दुल भाई शेख, पंकज डोईफोडे, मछिंद्र राठोड, शंकर परब, जतिन टिपनिस, माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर, महिला शाखा अध्यक्ष सिता नाईक, स्मिता पवार तसेच मोठ्या संख्येने समस्त पदाधिकारी महिला आघाडी विद्यार्थी सेना व कार्यकर्ते उपोषणाला उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद !! ** १०११ विद्यार्थ्यांचा सहभाग; स्पर्धा...