Tuesday, 26 July 2022

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठान (रजि.) तर्फे आदिवासी भागात मदतीचा हात !!

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठान (रजि.) तर्फे आदिवासी भागात मदतीचा हात !!


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
               महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठान (रजि.) तर्फे " एक हात मदतीचा " या उपक्रमाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील जि.प. शाळा तांबडीपाडा या दुर्गम आदिवासी विभागातील विद्यार्थी वर्गाकरिता शैक्षणिक साहित्य त्याच बरोबर शालेय उपयोगी वस्तू, मुलांना खाऊ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 


त्याच बरोबर कृषी प्रधान आपल्या देशातील शहरी भागातील युवकांना तसेच विद्यार्थींना शेती विषयक माहिती व्हावी या करिता तांबडीपाडा या ठिकाणी भात शेती (भात लावणी ) चे प्रशिक्षण देखील देण्यात आले. शिवाय उत्तम असे मार्गदर्शन ग्रामस्थानच्या माध्यमातून लाभले. या उपक्रमास ज्यांचे वल्ड मराठा ऑर्गनाझेशनचे महत्वाचं योगदान मिळाले. त्यांचे आयोजकांना तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्याच बरोबर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले ते सर्व देणगीदार यांचे मनःपूर्वक आभारही माणण्यात आले. संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी तांबडीपाड्यातील सर्व ग्रामस्थ तसेच जि. प. तांबडीपाडा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक श्री संतोष रघुनाथ निमसे यांचे देखील मनःपूर्वक आभार व्यक्त केले. असेच प्रेम व विश्वास या पुढेही संस्थेवर दाखवाल अशी आम्ही आशा बाळगतो असे मत आयोजक यांनी व्यक्त केले. या उपक्रमात संस्थेचे, पदाधिकारी ,कार्यकर्ते प्रसादमांडवकर, स्वाती गावडे, गौतम बनसोडे, निलेश कुडतरकर, साईनाथ खामकर, तुषार गांगुर्डेकर, विष्णू रामबाडे, मानसी बनसोडे, सचिन खेतले, सीमा भालेराव, मोनिका गाडे, छाया तांबे, आर्यन बनसोडे या सर्वांचे देखील मनापासून आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...