Tuesday, 26 July 2022

लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशाची लुट, अनेकदा कारवाई होईनही असे प्रकार वाढतेच ?

लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशाची लुट, अनेकदा कारवाई होईनही असे प्रकार वाढतेच ?


कल्याण, (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी वरून पुष्पक एक्स्प्रेस पकडण्यासाठी जात असलेल्या प्रवाशाला पोलिसांनी अडवले. त्याची बॅग आणि खिसे तपासले. यावेळी त्याच्या खिशात तंबाखूची पुडी मिळून आली. त्यानंतर, त्या प्रवाशाला कायद्याचा धाक दाखवून ३ हजार ५०० रुपयांची मागणी केली. मात्र, एवढे पैसे नसल्याचे प्रवाशाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून १ हजार २०० रुपये घेऊन सोडून दिले. यासंदर्भात प्रवाशाने १५१२ मदत कार्य क्रमांकावर पोलिसांनी लुटल्याची तक्रार दाखल केली असून, सीएसएमटी रेल्वे पोलिसांमार्फत याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे अशा भ्रष्ट पोलिसावर याआदी निलबंनाची कारवाई होऊनही असे प्रकार वाढतच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रेल्वे प्रवाशांच्या मदतकार्यासाठी, तत्काळ तक्रार नोंद करण्यासाठी १५१२ क्रमांकाची सुविधा प्रदान केली आहे. मौल्यवान वस्तू हरवल्याच्या, प्रवाशांमध्ये वादावादी झाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून १५१२ वर केल्या जातात. मात्र, प्रवाशाचे रक्षक असलेल्या पोलिसांकडून लूटमारीच्या तक्रारी १५१२ क्रमांकावर होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जुलै रोजी मध्यप्रदेशमधील खांडवा येथे जाण्यासाठी प्रवासी धमेंद्र विटलांगनी याने सीएसएमटी गाठले. पुष्पक एक्स्प्रेस पकडण्याकरिता फलाट क्रमांक १८ वर जात होता. यावेळी या फलाटाच्या पुलावर तीन साध्या वेशातील पोलीस गळ्यात ओळखपत्र घालून टेबलवर बसले होते. त्यांनी धमेंद्रला थांबवून त्याची बॅग तपासली, खिसे तपासले. यावेळी त्याच्या खिशात एक तंबाखूची पुडी मिळून आली. यावेळी, तीन पोलिसांनी त्याला महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाला बंदी असल्याची माहिती दिली. यासाठी ३ हजार ५०० रुपये दंड भरून पावती घेण्यास सांगितले. अन्यथा तुरूंगात जावे लागेल, असे धमकावले.

धमेंद्रकडे एवढे पैसे नसल्याने त्याने माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, असे तीन पोलिसांना सांगितले. त्यानंतर या साध्या वेशातील पोलिसांनी त्याला १ हजार २०० रुपये दंड भरावा लागेल. मात्र, याची पावती मिळणार नाही, असे सांगितले. त्याप्रमाणे धमेंद्रेने १ हजार २०० रुपये पैसे देऊन गाडी पकडण्यासाठी निघून गेला. त्यानंतर त्याने १५१२ क्रमांकावर तक्रार केली. यामध्ये त्याने सांगितले की, मी मुळचा राजस्थान मधील असून सुतार काम करतो. मुंबईमध्ये कामाकरिता आलो होतो. परंतु, येथे काम न मिळाल्याने खांडवा येथे कामाकरिता जात होतो. मात्र यावेळी तीन पोलिसांनी माझ्याकडून पैसे घेतले असून त्याच्या विरोधात कारवाई करावी, अशी तक्रार केली आहे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान या आधीही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई सेट्रल येथील अशा लुटारू पोलीसांवर अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी निलबंनाची कारवाई केली होती. परंतु यानंतर असे प्रकार कमी व्हायचे सोडून वाढतच आहेत. आताच्या या प्रकारात मोहिते, डुबल आणि नाईक या पोलिसांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...