Sunday, 10 July 2022

कन्नमवार नगर येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय नियमितपणे सुरू झालेच पाहिजे-मनसे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर

कन्नमवार नगर येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय नियमितपणे सुरू झालेच पाहिजे-मनसे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर 


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

       कन्नमवार नगर येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय नियमितपणे सुरू झालेच पाहिजे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असे मनसे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर यांनी सांगितले. या रुग्णालयात अनेक वर्षांपासून समस्या भेडसावत आहेत. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालय बंद होण्याची वेळ आली, असे दांडेकर म्हणाले.
           काही वर्षांपासून रुग्णालयाचे अनेक विभाग बंद आहेत. आता हे रुग्णालय वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णालयातील महत्त्वाची सामग्री इतरत्र हलवण्यात येत असल्याचे लक्षात आले आणि आम्ही विरोध केल्याचे दांडेकर म्हणाले. विक्रोळी विधानसभा क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी असलेले हे एकमेव रुग्णालय वाचावे, ही आमची भूमिका आहे. आम्ही मागे हटणार नाही. पाठपुरावा सुरू ठेवू, असे दांडेकर म्हणाले. दरम्यान, विक्रोळीतील सामाजिक आणि सर्वपक्षीय नेते एकत्र झाले आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पद्मश्री अहिरे यांच्यासह इतरही आरोग्य अधिकाऱ्यांची भेट या नेत्यांनी घेतली. यावेळी जयंत दांडेकर, डॉ. योगेश भालेराव, श्रुती घोगळे, राहुल वागधरे, विश्वजित ढोलम आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. रुग्णालय पूर्ववत सुरू झालेच पाहिजे अशी भूमिका घेतली. या रुग्णालयातील प्रसूतिगृहासह काही विभाग टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले होते. आयसीसीयू, शस्त्रक्रिया विभाग घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे *कोकण, बातमीदार : स्वतंत्र कोकण राज्य अभियाना...