Sunday, 24 July 2022

आगरी सेनेच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी "महेश भगत" यांची निवड !!

आगरी सेनेच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी "महेश भगत" यांची निवड !! 


मुरबाड :- (मंगल डोंगरे ) नुकताच कल्याण येथे आगरी सेनेच्या आगामी १ आँगस्ट २०२२ रोजी साजरा होणाऱ्या वर्धापन दिना संदर्भात नियोजन करण्यासाठीची सर्वसाधारण आढावा बैठक, आगरी सेना नेते प्रदिपभाऊ साळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये भविष्यात आगरी सेनेची असणारी वाटचाल, संघटना बांधणी, याबाबतही चर्चा झाली. त्यात संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी, कार्यकारिणी मध्ये फेरबदल करून जुण्या जाणत्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या जबाबदारीत वाढ करुन त्यांना बढती देण्यात आली. ज्यामध्ये  मुरबाड तालुका अध्यक्षपदी महेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना प्रदिपभाऊ साळवी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी आगरी सेनेचे कैलास पाटील, मनोज साळवी,चंद्रकांत ठाणकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष संपतराव डावखरे, ठाणे ग्रामीण नारायण अंदांडे, प्रभुनाथ भोईर, मंगेश शेलार, गणेश कडु, आगरी सेनेचे माजी मुरबाड तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके, तसेच ठाणे,कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, भिंवडी, येथील, असंख्य कार्यकर्ते, महिला आघाडी, पदाधिकारी, उपस्थित होते.
       मुरबाड तालुका नवनिर्वाचित आगरी सेना प्रमुख महेश भगत यांच्या निवडी बद्दल तालुक्यात तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन, भविष्यात आगरी सेनेचे कार्य हे तळागाळातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचेच असेल. आगरी सेना हि गोरगरिबांना न्याय मिळवून देणारी संघटना असुन, आतापर्यंत आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी साहेब यांनी या संघटनेच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने केली आहेत. यापुढे ही मुरबाड तालुक्यात संघटना अधिक जोमाने कार्य करील असा आशावाद  भगत यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...