कृषि संजीवनी सप्ताहाचा समारोप !
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी - 'जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा अनिल पाटील'
ठाणे, दि. १ बातमीदार : जिल्ह्यात घेण्यात आलेल्या कृषि संजीवनी सप्ताहाचा समारोप आज कृषीदिनी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकरी बांधवांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन करतानाच दुर्गम भागात असणाऱ्या जंगली औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्याचे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी, अनेक वर्षांपासून निविष्ठा विक्री करणारे विक्रेते, कृषी विभागाच्या योजनांची माहिती सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणारे विविध माध्यमांचे प्रतिनीधी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
*प्रयोगशील शेतकरी जिल्ह्याचे कृषी क्षेत्रातील ब्रॅण्ड अम्बॅसीडर- राजेश नार्वेकर*
जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर यावेळी म्हणाले, औद्योगिकरण आणि नागरिकरणात अग्रेसर असलेल्या ठाणे जिल्ह्यात सुमारे ८० शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत. शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर शेतीत प्रयोग करून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचे नाव उंचावले आहे. व्यावसायिक शेती करताना ती किफायतशीर व्हावी यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून उत्पन्न मिळविले आहे. असे पुरस्कार प्राप्त शेतकरी हे जिल्ह्याचे कृषी क्षेत्रातील ब्रॅण्ड अम्बॅसीडर असल्याचा उल्लेख श्री. नार्वेकर यांनी केला. ठाणे जिल्ह्याभोवती महानगरे आहेत आणि त्याच जोडीला तासाभराच्या अंतरावर शहपारू आणि मुरबाड सारखा ग्रामीण भाग देखील आहे शेती उत्पादन आणि बाजारपेठ या दोन्हीसाठी याचा समन्वय झाल्यास जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा वाटा असेल, असेही त्यांनी सांगितले.
किफायतशीर शेतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे- डॉ. भाऊसाहेब दांगडे.


No comments:
Post a Comment