Tuesday, 6 September 2022

प्रधानमंत्री उज्वला योजनेतून वेळंब घाडेवाडीत देण्यात आले गॅस कनेक्शन आणि प्रशिक्षण !!

प्रधानमंत्री उज्वला योजनेतून वेळंब घाडेवाडीत देण्यात आले गॅस कनेक्शन आणि प्रशिक्षण !!


*[निवोशी/गुहागर: उदय दणदणे]*

गुहागर तालुक्यातील 'वेळंब घाडेवाडी' येथे रंगलीला इंडेन ग्रामीण गॅस वितरक यांच्या वतीने "प्रधानमंत्री उज्वला" योजनेतून गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले असून लाभार्थ्यांना गॅस कसा हाताळायचा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. 


सदर गॅस कनेक्शन वेळंब गावचे कार्य तत्पर 'पोलीस पाटील श्री स्वप्नील तुकाराम बारगोडे' यांच्या सहकार्याने गरजू ग्रामस्थ जनतेला गॅस वाटप करण्यात आले. 'पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे' यांच्या प्रयत्नातून कोरोना या महाभयंकर साथीमध्ये मृत्यू झालेल्या वेळंब नालेवाडी येथील स्व.यशवंत विश्राम माळी यांची वारस पत्नी श्रीमती सुमित्रा यशवंत माळी यांच्या बँक खात्यात नुकतेच *"पन्नास हजार रुपयांची"* शासकीय मदत जमा झाली असून पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम व समाज सेवेप्रती ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...