Monday, 3 October 2022

राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू- भगिनींना ऑक्टोबर 2022 चे वेतन दिवाळीपूर्वी मिळावे : डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी.

राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू- भगिनींना ऑक्टोबर 2022 चे वेतन दिवाळीपूर्वी मिळावे : डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी.


कल्याण, (मनिलाल शिंपी) : दिवाळीपूर्वी शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना ऑक्टोबर 2022 चे वेतन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले.


      तसेच शिक्षण उपसंचालक मुंबई व कोल्हापूर यांनाही निवेदन दिले. मुंबईचे शिक्षण उपसंचालक माननीय श्री संदीपजी संगवे साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले, तसेच सहाय्यक उपसंचालक श्री शेषराव बडे साहेब, श्री सुनील सावंत साहेब यांची भेट घेऊन शालार्थ आयडी, अनुकंप मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या मान्यता, तसेच अर्धवेळ शिक्षकांच्या मान्यता, संच मान्यता दुरुस्ती टॅब उपसंचालका कडे शिक्षण संचालकांनी सोपवले आहे त्यानुसार प्रलंबित संचमान्यता दुरुस्ती करून मिळाव्यात, रिक्त- अतिरिक्त पदांबाबत, इत्यादी विषयांवर चर्चा करून शैक्षणिक समस्या घेऊन आलेल्या शिक्षकांची कामे करण्याची विनंती केली करण्यात आली आहे. विष्णू विशे ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना यांनी प्रसिध्दी दिली आहे.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...