Monday, 3 October 2022

"औरंगाबाद - पुणे रेल्वे मार्गा"चा प्रश्न तात्काळ मार्गी लावा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी !

"औरंगाबाद - पुणे रेल्वे मार्गा"चा प्रश्न तात्काळ मार्गी लावा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : रेल्वे स्थानक येथे कोच देखभाल सुविधांचा विकास
पायाभरणी समारंभ केंद्रीय रेल्वे, दळणवळण, ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंञी आश्विनी वैष्णव यांच्या शुभ हस्ते आज (३ ऑक्टोबर) संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे यांनी औरंगाबाद पुणे आठपदरी रेल्वे मार्गाच्या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले, यावेळी बोलताना ना. दानवे यांनी आठवण करून दिली की औरंगाबाद पुणे आठ पदरी रेल्वे मार्गाची घोषणा केंद्रीय मंञी नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती त्या संदर्भात राज्याचा आर्धा वाटा होता त्यात केंद्राने लक्ष घालावे, राज्य सरकारने जागा उपलब्ध करावी याची दखल घेऊन औरंगाबाद पुणे आठ पदरी रेल्वे मार्गाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी केली.

त्याचप्रमाणे औरंगाबाद मधील २० हजार मुले पुण्यात आयटी क्षेत्रात आहेत, औरंगाबाद आयटीची क्षेत्राची सुरुवात झाली होती त्यात वाढ होऊन आयटी क्षेत्र प्रकल्प विकसीत होणे गरजेचे आहे. सर्वाधिक आयटी प्रकल्प औरंगाबाद येथे झाले पाहिजेत.

औरंगाबादची पीटलाईन ही मागणी खूप वर्षापासून आहे २४ कोचची मागणी होती परंतु १६ कोचची झाली, औरंगाबाद हे पर्यटन उद्योग व भौगोलिक आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून बघितले जाते. त्यामुळे या ठिकाणी २४ कोच होणे गरजेचे आहे यामुळे कनेक्टिव्हिटी वाढू शकते.

तसेच पिट लाईन साठी ५ प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त आधीची जागा सूनिश्चित केली होती ती सुद्धा झाली पाहिजे ते काम लवकर करण्याचा प्रयत्न करावा याही मागणीकडे लक्ष वेधून घेतले.

कोच देखभाल सुविधांचा विकास पायाभरणी कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंञी रावसाहेब पाटील दानवे, प्रमुख पाहुणे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते.

तसेच पालकमंञी संदीपान भुमरे,सहकार मंञी अतुल सावे,खा.इम्तियाज जलील,विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.हरिभाऊ नाना बागडे, आ.सतिष चव्हाण, संजय सिरसाट, नारायण कुचे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...