मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी !
मुंबई, अखलाख देशमुख, दि २५ : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दीवाळी साजरी केली. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना सहकुटुंब आमंत्रित करण्यात आलं होतं. यात सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून जगन्नाथ कुदळ आणि बाबुराव दुधे हे दोन शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते.
या प्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक,आमदार प्रवीण दरेकर,माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती शेतकऱ्यांशी सहानुभूती पूर्वक संवाद साधला.परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी विभागीय पातळीवर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातील. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिंदे-फडणवीस सरकार आहे,अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले

No comments:
Post a Comment