मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
श्री अनंत मंगल संस्थेच्यावतीने टायगर ग्रूप नवी मुंबईचे कार्याध्यक्ष संजय भाऊ जाधव (टायगर ग्रूप) आण्णा यांचा वाढदिवसनिमित्त त्यांच्या नवी मुंबई शाखा येथे मोठया थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी श्री अनंत मंगल संस्था संस्थापक मानवी हक्क संरक्षण सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष, महिला आघाडी माहिती अधिकार, पोलिस मिञ व पत्रकार संरक्षण सेना आंतरराष्ट्रीय महिला अध्यक्ष, भारतीय महाक्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी, अनाथांची माई जेष्ठ समाजसेविका माईसाहेब सावर्डेकर आणि श्री अनंत मंगल संस्था अध्यक्ष सक्रीय समाजसेवक, माहिती अधिकार, पोलिस मिञ व पत्रकार संरक्षण सेना मुंबई जिल्हा सरचिटणीस श्री. आकाश राजेश कासारे, माहिती अधिकार, पोलिस मिञ व पत्रकार संरक्षण सेना मुंबई जिल्हा उपसरचिटणीस श्री.अक्षय घेगाडमल, अबदुल खान, दिनेश बरून आदी मान्यवर उपस्थित होते. टायगर ग्रूप नवी मुंबई कार्याध्यक्ष संजय भाऊ जाधव (टायगर ग्रूप ) आण्णा यांच्या बदल जर का बोलायच झालं तर भाऊ आज महाराष्ट्र भर आण्णा या नावाने प्रसिद्ध आहेत. आण्णा यांनी लहान अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत केक कापला. आज आण्णा त्यांच्या नावाने संस्था चालवत असून गोर -गरीब जनतेस सुध्दा आवश्यक ती मदत जशी जमेल तशी करण्यासाठी मदतीला धाऊन जात असतात. गेली अनेक वर्ष ते अनाथ, बेघर मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करत आहेत. आताच्या भावी पिढीला सुध्दा कशाप्रकारे पुढे जाता येईल त्या गोष्टीचा सुध्दा विचार करून कार्य करत आहेत. त्यांचे हे कार्य जयश्रीमाईना खुप कौतुकास्पद वाटले. समाजात खूप कमी लोक असतात श्रीमंती नसून सुध्दा गोर गरीबाची देखभाल करत समाजाचे आपण काही तरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून समाजसेवा करत असतात. आण्णा ही यातील एक आहेत. समजभान लक्षात घेऊन ते गरिबांचा सांभाळ करत आहेत. श्री अनंत मंगल संस्थेच्या संपूर्ण टीमला याचा अभिमान आहे. शेवटी शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


No comments:
Post a Comment