मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
चेंबूरच्या रोचीराम टी थडानी हायस्कूल फॉर हिमरिंग हँडीकॅप्ट या शाळेतील विकलांग मुलांना आज गुरुवार दि.२७ ऑक्टोंबर रोजी ऑलवेज हेल्पिंग हँड तर्फे दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी ऑलवेज हेल्पिग हँडच्या अध्यक्षा सारिका कदम, शाळेचे सचिव पपन सहेजा, उपसचिव सुरेश मलकानी, मुख्याध्यापिका भाग्यश्री वर्तक, परेश पाटडीया, शैलेश मोहिते, समीक्षा कदम, लोकेश शेट्टी, महेश पोळ, निलेश मोरे, प्रज्वल कदम, आदी उपस्थित होते. मुंबईतील ऑलवेज हेल्पिग हँड या सामाजिक संस्थे तर्फे दरवर्षी दिवाळी निमित्त विविध उपक्रम घेण्यात येतात. आदिवासी पाडे , विविध गावे तसेच मुंबईत फुटपाथ, रस्ते आदी ठिकाणी गुजराण करणाऱ्यांना ऑलवेज हेल्पिग हँड मदतीचा हात पुढे करत असते. चेंबूर येथील हँडीकॅप्ट शाळेतील मूकबधिर व कर्णबधिर अशा मुलांना ऑलवेज हेल्पिग हँड तर्फे बॅग्स, दिवाळी भेट वस्तू व चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील १२५ मुलानी आपली उपस्थिती दर्शवली. संस्थेच्या सर्व सदस्यांनी मुलांशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. यावेळी ऑलवेज हेल्पिग हँडच्या आर्ट इन फॅशन या दिवाळी अंकाचे प्रकाशन कर्णबधिर व मूकबधिर मुलांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Thank you very much
ReplyDeleteमाझ्या शाळेतील विध्यार्थ्यांना छान छान भेटवस्तू मिळाल्या.ही बातमी सर्वांपर्यंत तुम्हा पत्रकारांमुळे पोचू शकली याबद्दल खूप खूप धन्यवाद💐💐