नाशिक येथे कृषिथोँन प्रदर्शनाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन !
नाशिक, अखलाख देशमुख, दि २६ : नाशिक येथे दि.24 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित कृषीथॉन प्रदर्शनाच्या आजच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन करीत कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन कृषि संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याने अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित केले गेले पाहिजे . तसेच शेतकऱ्यांनी देखील याचा लाभ घेतला पाहिजे असे ना.अब्दुल सत्तार म्हणाले.* यावेळी कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच ना. अब्दुल सत्तार यांनी आयोजित प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, औरंगाबाद जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, माजी औरंगाबाद जि.प.चे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे, नॅशनल सुत गिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, नाडाचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, नाडाचे खजिनदार मंगेश तांबट, कृषी विभागाचे सहसंचालक मोहन वाघ, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत ठक्कर, प्रभाकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते, तर
व्यासपीठावर कृषीथॉनचे आयोजक संजय निहारकर, अश्विनी निहारकर, साहिल न्याहारकर, बापूराव पाटील, महेश हिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment