अल्पसंख्याक शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत) योजना अचानक बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा : शेख अब्दुल रहीम
*हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे थेट राष्ट्रपती श्रीम.द्रौपदीजी मूर्मु अणि पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना निवेदन सादर*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अल्पसंख्याक कार्य व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी अचानक 25/11/22 च्या पत्राद्वारे कळविले आहे की अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना RTE 2009 नुसार इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत मोफत शिक्षण आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आलेला आहे की अल्पसंख्याक विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारे इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फक्त 9 वी आणि 10 वी व वरील वर्गाच्या विद्यार्थ्यांना दिली जाईल असा निर्णय अचानक घेण्यात आलेला आहे.अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्ती मिळत होती, मात्र अचानक सदरील शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपणास विनंती आहे की हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा किंवा किमान या वर्षासाठी तरी शिष्यवृत्ती द्यावी. कारण या वर्षी लाखो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले आहेत. एकट्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 11,99,833 (नवीन/नूतनीकरण) विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांना त्यासाठी उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला यांसारख्या दाखल्यासाठी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे या वर्षी किमान पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सदरील योजना गतवर्षीप्रमाणेच ठेवावी. अशा मागणीचे निवेदन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी थेट देशाच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना ईमेलद्वारे सादर करण्यात आलेले आहे. माननीय राष्ट्रपतीजी यांनी स्वतः या समस्येमध्ये लक्ष देऊन अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती (1ली ते 8वी) बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून भारतातील लाखो अल्पसंख्याक समुदायाच्या विद्यार्थ्यांना पूर्ववत शिष्यवृत्ती मिळवून द्यावी हि विनंती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment