Saturday, 26 November 2022

आडिवली दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा, तालुक्यात पहिल्यांदा संविधान प्रभात फेरी !

आडिवली दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा, तालुक्यात पहिल्यांदा संविधान प्रभात फेरी !

कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधान दिनाचे आयोजन कल्याण तालुक्यातील आडिवली दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी संपूर्ण गावातून संविधान प्रभातफेरी काढण्यात आली, ऐवढ्या मोठ्या प्रमाणात संविधान रँली काढणे हे तालुक्यातील कदाचित पहिलीच घटना असावी, यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, गावात सर्वत्र आंनदाचे व उत्साहाचे वातावरण पाह्याला मिळत होते.

मसुदा समितीचे अध्यक्ष डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत, कष्ट घेऊन तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवसांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना तयार केली व ती २६ नोव्हेबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली व २६ जानेवारी १९५० पासून भारतात घटनेप्रमाणे राज्यकारभार सुरु झाला, त्यामुळे शासनाने २६ नोंव्हेबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले, त्यानुसार आज तालुक्यातील आडिवली दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये युवा संस्कार बहुउद्देशिय संस्था व ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद शाळा दहिवली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास कल्याण तालुका फाँरेस्ट आँफिसर रघूनाथ चन्ने, जेष्ठ पत्रकार संजय कांबळे, सिनेअभिनेते सिध्दू गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रथम घटनाकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला,यांनतर साहूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

शाळेचे विद्यार्थी, पालक, महिला बचतगट, पाहुणे, या सर्वांनी संविधान प्रभात फेरी गावातून काढली, यावेळी संविधानाचा विजय असो, डाँ,बाबासाहेब आंबेडकर की जय आदी घोषणांनी गाव दणाणून सोडण्यात आले, प्रभात फेरी शाळेत आल्यानंतर रेंज आँफिसर रघुनाथ चन्ने, पत्रकार संजय कांबळे, अभिनेते सिध्दू गायकवाड, आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रविण शेलवले यांनी संविधान दिनाचे महत्व सांगितले, तर पत्रकार संजय कांबळे यांनी प्रत्येकानी आप आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर संविधान यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही, काम कोणतेही छोटे किंवा मोठे नसते, गावाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येवून काम करुन देशात आपल्या गावाचा डंका वाजला पाहिजे असे काम करुया असे सांगितले तर 
वनाधिकारी रघुनाथ चन्ने म्हणाले, संविधानाने आपल्याला सर्वात मोठा अधिकार दिला आहो तो म्हणजे मताचा अधिकार, होय, याशिवाय आपण केवळ आपले हक्क, अधिकार मागतो, त्याचा विचार करतो पण बरोबर कर्तव्य विसरतो, असे होता कामा नये ,असे सांगून आपल्या आजूबाजुच्या वनसंपत्तीचे जतन, संवर्धन करावे, वणवे टाळावे असे अवाहन त्यांनी केले.

याप्रंसगी ग्रामपंचायतीचे सरपंच कमलाकर राऊत,शाळेचे मुख्याध्यापक किरन काटे, यांनीही संविधान दिनाचे महत्व सांगितले, यावेळी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या तन्वी ठाकरे, संदेश कोलाज, मनस्वी मिरकुटे, कृपा राऊत, भावेश जाधव आणि नेहा म्हाडसे आदी विद्यार्थाचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, शेवटी पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला,

यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच कमलाकर राऊत, उपसरपंच दर्शन मलिक, सदस्य सोमनाथ सांवत, दामिनी जाधव, अनिता राऊत, पोलीस पाटील उषा राऊत, आशासेविका लता मिरकुटे, अंगणवाडी सेविका लता मिरकुटे, युवा संस्कारचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, महिला बचतगट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...