गोवरचे संसर्ग आटोक्यात आणण्यास मनपा सज्ज !
*२१ ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : जिल्ह्यात गोवरचे संसर्ग सुरू असून औरंगाबाद महानगरपालिकेने या संसर्गाला तोंड देण्याची जय्यत तयारी केली आहे.
हाय रिस्क भागात (ज्या परिसरात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी) आरोग्य विभागातर्फे अतिरिक्त २०लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मेलट्रोन हॉस्पिटलमध्ये गोवरचे रुग्णांचे उपचारासाठी विशेष विलगिकरन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने हा आजार पाच वर्षा खालील मुलांमध्ये आढळतो. सर्दी, ताप, खोकला, डोळे लाल होणे व सुरुवातील चेह-यावर व नंतर पूर्ण शरीरावर लाल पुरळ येणे ही प्रमुख्याने लक्षणे गोवर रुग्णांमध्ये आढळतात.
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत ही या अनुषंगाने गोवर रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.ताप व पुरळ असलेले बालकांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे.
औरंगाबाद महानगरपालिके तर्फे गोवर उद्रेक होवू नये म्हणून खालील उपाययोजना राबविण्यात येत आहे.
• आशावर्कर्स मार्फत घरोघरी गोवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.प्रत्येक संशयित गोवर रुग्णांना जीवनसत्व 'अ' (Vit.A) चे दोन डोस देण्यात येत आहे.
• विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्या बालकांचे लसीकरण राहीलेले आहे. त्या बालकांची यादी तयार करुन त्यांना लस देण्यात येणार आहे.
• प्रत्येक संशयित संशयित गोवर रुग्ण आढळल्यास त्याचा प्राथमिक उपचार आरोग्य केंद्रामार्फत करण्यातयेत आहे व गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहे.
• खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व बालरोगतज्ञ यांना याबाबत माहिती देवून त्यांना ही संशयित गोवर रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागास देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
● सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देवून गोवर रुग्णांची माहिती देण्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment