स्पर्धेत अंतिम विजेता श्री पाणबुडी ईलेव्हन ( मुंबई ) तर उपविजेता निलेश ईलेव्हन ( कातळवाडी ) संघ ठरले स्पर्धेचे मानकरी !
मुंबई - ( दिपक कारकर ) अल्पावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) उपरोक्त मंडळातर्फे नुकत्याच मुंबईतील चर्चगेटच्या ओव्हल मैदान येथे रविवार दि.४ डिसेंबर २०२२ रोजी एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वाडी व गाव गटातील स्पर्धेत १६ संघांचा सहभाग होता.या स्पर्धेत श्री पाणबुडी ईलेव्हन ( मुंबई ) हा संघ अंतिम विजेता तर चिपळूण तालुक्यातील निलेश ईलेव्हन ( कातळवाडी ) हा संघ उपविजेता ठरला. विजेत्या/उपविजेत्या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.दरम्यान स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज प्रदिप कातकर ( श्री पाणबुडी ईलेव्हन ) व उत्कृष्ट गोलंदाज पंकज ( श्री पाणबुडी ईलेव्हन ) ह्या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेला लोकशाहीर मधुकर पंदेरे, शाहीर तुषार पंदेरे, शाहीर झराजी वीर, टीम सचिन चाहते सर्वेसर्वा शाहीर सचिन धुमक, सामाजिक कार्यकर्ते संजय आगिवले आदींची उपस्थिती होती. ह्या सोहळ्याप्रसंगी संजय आगिवले यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. आजवर प्रत्येक क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) मंडळाचे अनेकांकडून अभिनंदन सहित कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment