Sunday, 4 December 2022

वीर ग्रामविकास मंडळ, मुंबई ( रजि.) तर्फे नाट्यप्रयोग व स्नेहसंमेलन सोहळा संपन्न !

वीर ग्रामविकास मंडळ,मुंबई ( रजि.) तर्फे नाट्यप्रयोग व स्नेहसंमेलन सोहळा संपन्न !

मुंबई - ( दिपक कारकर ) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपरोक्त संस्थेतर्फे गावच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्यास सांस्कृतिक उपक्रम मंडळाने हाती घेतला होता.चिपळूण तालुक्यातील दूरच्या टोकातील नयनरम्य निसर्गाच्या कुशीत वसलेलं वीर गाव होय.ह्या गावच्या युवकांच्या तरुण भरणाईचं हे मंडळ प्रतिवर्षी अनेक उपक्रम राबवत असते.रविवार दि.४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० : ०० वा.सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते संजय खापरे यांचे "गलतीसे मिस्टेक" ह्या धम्माल विनोदी नाटकाचा प्रयोग दादरच्या शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडला. ह्या सोहळ्याला डॉ. राजेंद्र गुरव सर ( प्राचार्य श्री. ना. दा. ठा. कला आणि श्री. चं.भो. वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, मुंबई ), नामदेव दुर्गोळी गावकर (वीर-देवपाट), श्रेया वीरकर सरपंच (वीर-देवपाट ), संतोष अबगुल - ( अध्यक्ष संतोष अबुल प्रतिष्ठान ), उदय जावळे - ( अध्यक्ष वीर देवपाट विकास मंडळ ), अनंत कोदारे - ,( अध्यक्ष कुणबी मंडळ वहाळ विभाग ), अशोक दुदम ( नमन निर्माते ), शरद आग्रे -( सचिव कुणबी विकास मंडळ वहाळ विभाग ), विजय वाघमोडे सर ( मुख्याध्यापक शाळा वीर नं. २ ) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. वीर ग्रामविकास मंडळाच्या कौतुकास्पद कार्याला मान्यवरांनी मनभरून शुभेच्छा दिल्या. ह्या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !! 1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांचे...