कल्याण, (प्रतिनिधी): सुभेदार रामजी भांगरे, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, यांच्या जन्मभूमी असलेल्या आणि क्रांतिची ठिणगी पडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी समाजात जन्म घेतलेल्या व आपल्या विषमुक्त शेतीने जगभर पोहचलेल्या' पद्मश्री ,राहीबाई सोमा पोपेरे या बिजमातेची कल्याण येथील पत्रकार संजय कांबळे यांनी नुकतीच भेट घेतली, यावेळी बोलताना या भागातील रस्ते, पाणी, आणि माहिती/ दिशा दर्शकाचा अभाव असल्याचे बीजमाता राहीबाई यांनी बोलून दाखवले.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हा तालुका तसा क्रांतिकारकाचा, वीर रामजी भांगरे, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, देवजी आव्हाड, बाळू पिचड आदी शेकडो नरवीरांचा, त्यांना शौर्याची, कार्याची साक्ष देणा-या नोंदी आजही उपलब्ध आहेत. या तालुक्यातील आदीवासी समाजात कोंभाळणे या दर्गम गावाव परिसरात जन्मलेल्या आणि विषमुक्त शेतीचे बीज रोऊन जगभर पोहचलेल्या बिजमाता राहीबाई पोपेरे यांना शेतीचे विलक्षण वेड होते, यांत्रिक व रासायनिक शेतीला विरोध त्यांनी गावरान जातीच्या भात, वाल, नागली, मेथी, कारली, दोडका, आदी शेकडो भाजीपाला व इतर पिकांचे वाण शोधून काढले.
आजमितीस सुमारे १५० प्रकारच्या गावरान आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या पिकांचे बियाणांचे जतन केले आहे. या शिवाय वालाचेच १२० प्रकार, नानाविध बयाणाचे संवर्धन केले आहे.जमीन चांगली तर पीक चांगले, जुनं ते सोनं असा ठाम विश्वास असलेल्या राहीबाई यांनी गावरान भाजीपाला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पिकवला पाहिजे,लहानपणापासून ते वृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न गेले पाहिजे या हेतूने त्या धडपड करत आहेत, याला मोठ्या प्रमाणात यश देखील मिळाले, त्यांच्या प्रेरणेने नाशिक व नगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर जमीनीवर विषमुक्त शेती केली जाते.
स्वतः शाळेची कधीही पायरी न चढलेल्या अशिक्षित राहीबाई पोपेरे आज आपल्या अंगभूत गुणांनी चालतंबोलत'कृषी विद्यापीठ, बनल्या आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल भारत सरकारने घेऊन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते २०१८ मध्ये त्यांना "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना 'मदर आँफ सीड्स, अशी उपाधी दिली, तेव्हापासून त्या बीजमाता म्हणून जगभर ओळखल्या जाऊ लागल्या, बी बी सीने जगातील१००प्रभावशाली महिला मध्ये या बीजमातेला स्थान दिले आहे.
अशा या जागतिक किर्ती च्या बीजमातेच्या गावी देशभरातून शेतकरी, संस्था, संघटना, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, भेट देतात, नाशिक, घोटी, टाकेद बु, खिरवीरे मार्गे यावे लागते, पण म्हैसकळण घाट, एकदरे, इदेवाडी, पाडसी, देवगाव, शेणवीरे, निळवंडे, जायनावाडी, बिताका, पिपळदरवाडी, आंबेवंगण, कोंभाळणे, आदी परिसरातील रस्त्याची पुरती दैना झाली आहे. इतकेच नव्हे तर या रस्त्यावर कोठेही दिशादर्शक, फलक,किंवा पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या नावाचा फलक नाही, तो नसल्यामुळे अनेक नवीन लोकांचा रस्ता चुकतो, ऐवढेच नाही तर या बिजमातेला भीषण पाणीटंचाई ला सामोरं जावं लागतं आहे. तशी खंत तिने बोलून दाखविली, आज शेकडो पुरस्कार, सन्मान पत्र, ट्राफी यांनी घर भरले आहे, पण त्यांचे जतन करण्यासाठी अद्ययावत खोली नाही,
त्यामुळे समाजाला विषमुक्त करणाऱ्या या बीजमातेला तिच्या काही अंत्यंत मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावं लागते हे दुर्दैव म्हणावे का ?
No comments:
Post a Comment