नववर्ष्याच्या सुरवातीला सिल्लोड येथे कृषी महोत्सव कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची संकल्पना !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ४ : सिल्लोड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत या महोत्सवात माहिती देण्यात येणार असल्याने या महोत्सवाच्या जनजागृती तसेच कृषि महोत्सवाची निर्धारित वेळेत तयारी पूर्ण करून कृषी महोत्सवाच्या सुयोग्य नियोजनासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व मार्गदर्शनातून सिल्लोड येथे 1 जानेवारीपासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या तयारी बाबत सिल्लोड येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
बैठकीस 'आत्माचे' संचालक दशरथ तांबळे, विभागीय कृषी सह संचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब तौर, जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, जि.प.माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, संगीतकार प्रमोद सरकटे, नॅशनल सुत गिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, सतीश ताठे, अशोक देशमुख, गणेश ढोरमारे, वर्षा पारखे, तसेच विशेष कार्य अधिकारी उदय देवळणकर, डॉ. दिलीप देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, सोयगाव तालुका कृषी अधिकारी संपत वाघ , भोकरदन ता.कृषी अधिकारी रामेश्वर भुते ,सिल्लोड पं. स.कृषी अधिकारी संतोष भालेराव आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment