आरोग्याचा संदेश देत मॅरेथॉन मध्ये धावले हजारो धावपटू !
"मान्यवरांसह जेष्ठ नागरिकांचा" सहभाग
जळगाव, अखलाख देशमुख, दि ५ : सदृढ आरोग्याचा संदेश देत हजारो धावपटूंनी गुलाबी थंडीत खान्देश रन २०२२ मध्ये सहभाग घेतला. १२५ जेष्ठ नागरिकांसह दिव्यांग विद्यार्थ्यांनी ही सहभागी झाले. निरोगी मन निरोगी शरीर चा संदेश देण्यासाठी रनर ग्रुपतर्फे रविवार दि.४ डिसेंबर २०२२ रोजी सहाव्या खान्देश रनचे सागर पार्क येथून आयोजन करण्यात आले होते. तीन हजार रनर्सनी यात सहभाग नोंदविला.चार विविध गटात झालेल्या मरेथॉनला सागरपार्क येथून सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून खा.उन्मेष पाटील, प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन, माजी महापौर रमेशदादा जैन,विष्णू भंगाळे, गोदावरी फॉउडेशनचे अध्यक्ष माजी खा.डाँ.उल्हास पाटील, सदस्या डाँ. सौ.केतकी पाटील,अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन,डी. डी. बच्छाव, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दीक्षित, किरण बच्छाव यांच्यासह रनर्स ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. सूत्रसंचालन राहुल त्रिवेदी यांनी केले.
सागरपार्क, काव्य रत्नावली चौक, डिमार्ट, मोहाडी रोड, लांडोरखोरी रायसोनी नगर येथून यू टर्न घेऊन पुन्हा याच मार्गाने सागरपार्क येथे स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार तब्बल २१ कि. मी.तर त्यांच्या पत्नी १० की.मी., खा.उन्मेष पाटील, महापौर सौ.जयश्री महाजन, डाँ उल्हास पाटील,रमेशदादा जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे हे प्रत्येकी ३ कि. मी.धावले. नगरसेविका ऍड सौ.शुचिता हाडा या ५ कि. मी.धावल्या. तसेच जळगावातील यात विविध वयोगटातील शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment