Wednesday, 24 June 2026

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम...

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम...

*समाजसेविका रुचिता नाईक यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम...*

नालासोपारा ता, २४ :- सामाजिक बांधिलकी जपत आणि  सेवाभावी उपक्रम राबवत बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते व वसई विकास सहकारी बँकेचे मा.संचालक "हेमंत म्हात्रे (बंधू)" यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन समाजसेविका रुचिता नाईक यांचा वतीने नालासोपारा शहरात करण्यात आले होते.

सोपारा हॉस्पिटल येथे रूग्णांना मोफत फळे वाटप उपमहापौर मार्शल लोपीस साहेब व नगरसेवक अतुल दादा साळुंखे यांचा उपस्थितीत करण्यात आले. या भावस्पर्शी उपक्रमाने रुग्णांचा चेहर्‍यावर मोठा आनंद पाहायला मिळाला फळे स्विकारताना जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांना निरोगी आणि उदंड आयुष्याचा भरभरून शुभेच्छा दिल्या.
 उपमहापौर मार्शल लोपीस साहेब यांनी रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रुग्णालयातील समस्यांबाबत डॉक्टर यांच्याशी चर्चा करून आरोग्य सेवेत अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांना आदेश दिले.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या कृतज्ञतापूर्ण  उपक्रमाबद्दल रुचिता नाईक आणि उपस्थित मान्यवरांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गुरुवारी अंगणवाडी क्रमांक ११० येथे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बहुजन विकास आघाडीचे नवनाथ पगारे, हितेश म्हात्रे, भाविक चावडा, जया गुप्ता, महेश निकम, अमित नाईक, नीतेश पाटील, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

केडीएमटी बस आणि कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही !!

केडीएमटी बस आणि कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही !! *डोंबिवली, दि. २ सप्टेंबर २०२६* डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात आज मंगळ...