Wednesday, 24 June 2026

वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी आयुक्तांचा ठोस निर्णय; उल्हासनगर-अंबरनाथला नोटीस !!

वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी आयुक्तांचा ठोस निर्णय; उल्हासनगर-अंबरनाथला नोटीस !!

*कल्याण, दि. 23 जून 2026*

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था, कल्याण पश्चिम सातत्याने पाठपुरावा करत आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर मागील सहा महिन्यांपासून माननीय महापौर, आयुक्त व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे याबत पाठपुरावा करत आहेत.

*पाणी दौऱ्यातून प्रत्यक्ष पाहणी*  
संस्थेच्या मागणीनुसार 13 जून 2026 रोजी माननीय आयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वालधुनी नदीचा प्रत्यक्ष पाणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यात नदीतील वाढते प्रदूषण, सांडपाणी व घनकचरा याबत सविस्तर पाहणी करण्यात आली.

*उल्हासनगर व अंबरनाथला नोटीस*  
पाणी दौऱ्यानंतर माननीय महापौर व आयुक्त यांनी ठोस भूमिका घेतली. उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या क्षेत्रातून वालधुनी नदीत सोडले जाणारे प्रदूषित पाणी तात्काळ थांबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार नोटीस क्रमांक 521, दिनांक 23 जून 2026 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत संबंधित संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे.

*संस्थेचे पदाधिकारी उपस्थित*  
या पाणी दौऱ्यास संस्थेचे पदाधिकारी विशांत कांबळे, गणेश कांबळे, सुरेश अहिरे, सुनीता खेताडे, सुरेखा दिविलकर, रसिका बागवे, अनिल सरदार तसेच विविध स्थानिक संस्था व नागरिक उपस्थित होते.

आयुक्तांनी घेतलेल्या या सकारात्मक व ठोस निर्णयाचे संस्थेने स्वागत केले आहे. वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आवश्यक कामांना तात्काळ सुरुवात करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम...

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम... *समाजसेविका रुचिता नाईक यांचा स्तु...