वंचित बहुजन आघाडी नांदेड (उत्तर) महानगरच्या वतीने ; “आदर्श विकासाचा पोस्टमार्टम”
नांदेड़ दि ४ : वंचित बहुजन आघाड़ी कडून जनसंवाद अभियानाची आज लालवाडी ते नारायण नगर परिसरातून सुरुवात करण्यात आली.
सदरील अभियानातुन खालील समस्या चव्हाट्यावर आलेतः
१. लालवाडी ते नारायण नगर जोडणारे दोन रस्ते लालवाडी अंडरब्रीज पर्यंत प्रशस्त रस्ता असुन ही आजतागायत मनपाच्या दोन टर्मचे नगरसेवक पोकळ आश्वासन देत आहेत.
२. लालवाडी ते नारायण नगर पांदन रस्ता शासनाने 60 फुट रुंदीकरण करण्याचे आदेश दिले असुन सदरील रस्ताच मनपा ने अवैध रित्या बिल्डरांच्या हितासाठी बंद करुन अवैध अतिक्रमण केलेला आहे.
३. एक ही गल्ली मधील ड्रेनेज लाईन तांत्रिक रित्या योग्य नसल्यामुळे कोट्यावधी रुपयाचां भ्रष्ट पध्दतीने व्यर्थ केले आहे. ड्रेनेज लाईनमुळे जनतेच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झाली असुन मलनिस्सारण भर रस्त्यावरून होत आहे.
४. रस्ते, नाल्या तर नाहीच अनेक ठिकाणी पोल व लाईट्स नसल्यामुळे अंधकाराचे साम्राज्य पसरले आहे.
५. पिण्याच्या पाणीची पाईप लाईन ही चक्क नालीतुन जोडुन देण्यात आल्यामुळे घरा-घरात अळ्यांचे घाण पाणी पिण्याची पाळी आली आहे.
No comments:
Post a Comment