मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली समृद्धि महामर्गाची पाहणी !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ४ : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबरला होणार आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री - एकनाथ संभाजी शिंदे व उपमुख्यमंत्री यांनी आज नागपूर ते शिर्डी प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य केले. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या ५३० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून आज दुपारी आपला प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार दौऱ्यात होते.
उभय नेत्यांनी दौऱ्यास सुरुवात केल्यानंतर या महामार्गाच्या कार्यकक्षेतील जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी स्वागत केले. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा हे जिल्हे तसेच जालना, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले.
No comments:
Post a Comment