Saturday, 3 December 2022

महापुरुषांच्या सन्मानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी.. छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू येथे आत्मक्लेश !

महापुरुषांच्या सन्मानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी.. छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू येथे आत्मक्लेश !

पुणे/वढू, अखलाख देशमुख, दि ३ : गेल्या काही दिवसांपासून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अवमान केला जात असल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला, अस्मितेला भावनेला ठेच पोहोचत आहे. 

आमच्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोही प्रवृत्तींचा धिक्कार करण्यासाठी आज छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू (पुणे) येथील समाधिस्थळी एकत्र येऊन तमाम शिवप्रेमीनी ‘आत्मक्लेश’ आंदोलन केले. आ. रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात जुनेद दुर्रानी पाथरी येथून सर्व सहकाऱ्यांसोबत सहभागी झाले होते.

यावेळी आ. अशोकबापू पवार, आ. प्राजक्तदादा तनपुरे, आ. संजयजी दौंड, आ. संदीपभैया क्षीरसागर, आ. अमोलजी मिटकरी, आ. अतुलशेठ बेनके, आ. सुनीलजी टिंगरे, आ. संजयजी जगताप, अन्य मान्यवर पदाधिकारी व हजारो शिवप्रेमी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !! कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६) कल्याण डोंबिवली...