धनवाडी गायरान कसणारे आदिवासींना नावे जमिनी करा ! लाल बावटा ची मागणी !!
चोपडा, प्रतिनिधी.. तालुक्यातील धनवाडी येथील भूमापन गट नंबर 37 वर गेल्या बावीस वर्षापासून स्व महिन्यातील जमीन तयार करून त्यात उदरनिर्वाह करणाऱ्या दहा भिल्ल कुटुंबीयांना त्यांच्या कब्जातील जमिनीचे ताबे कागदपत्री देऊन त्यांना मालक करा..! 2000 साली पोलिसात तक्रारी केल्या होत्या. त्या बाबत चौकशी झाली नंतर वारंवार जिल्हाधिकारी व इतर शासन अधिकारी, आदिवासी मंत्री यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने तहसीलदारांना चौकशीची आदेश दिल्यानंतर नंतरही त्यांच्या अर्जांचा विचार झाला नाही.
एवढेच नाही तर माहिती अधिकार वापरूनही तहसीलदार कार्यालयातून आदिवासींना उत्तर दिले नाही. माहिती अधिकाराचा अंतर्गत अपील जिल्हाधिकारी कार्यालयात देऊनही कार्यवाहीची उत्तर मिळाले नाही. माहिती अधिकार कायदा चे सरळ सरळ उल्लंघन करण्यात आले तसेच 6 ऑक्टोबर 2022 च्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाने शेतमजूर मतदार विरोधी लोक खुश झाले असून ते या निकालाच्या निमित्ताने भूमी यांना भूमी आदिवासी यांना त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे कट कारस्थान करत आहेत .तेव्हा धनवाडी ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात ग्रामपंचायतीने नोटीस देताना काहीना च नोटिसा दिल्या या पक्ष पाताची चौकशी करा !! 6 ऑक्टोबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे गायरान जमीन असणाऱ्या गरीब लोकांमध्ये दहशत व असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना त्यांचे पोट भरण्याचे साधन हिरावून घेतले जाईल अशी भीती निर्माण झालेली आहे .. या संदर्भात महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे मुंबई हायकोर्टात व औरंगाबाद हायकोर्टातही रिट पिटीशन दाखल केले आहेत. तरी या रीट याचिकांचा विचार करता गायरण जमिनी कसत असलेल्याना बेदखल करू नका, अशी विनंती चोपडा तहसीलदार यांना करण्यात आलेली आहे.. धनवाडी आदिवासींचया अतिक्रमणाची चौकशी चोपडा तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली ती चौकशी जिल्हा लालबावटा शेतमजुर युनियन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी यांना 25 नोव्हेंबर रोजी जे निवेदन त्याच्या अनुषंगाने चौकशी झाली.त्या वेळी जो खुलासा देण्यात आला त्यात सदरचे निवेदन मध्ये सविस्तर खुलासा देणेत आला लालबावटा शेतमजुर युनियन नेते काम्रेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात चोपडा चे नायब तहसीलदार बामबळे यांना खुलासा सादर करण्यात आला. त्यावेळी अतुल भील ,जिजाबाई भील /छाया भिल, अंजना भिल, तुकाराम भिल, वना भील हजर होते..
No comments:
Post a Comment