Monday, 16 January 2023

जळगांव भाजपाची बैठक जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न !

जळगांव भाजपाची बैठक जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न !

जळगाव, अखलाख देशमुख, दि १६ : भारतीय जनता पार्टी ने प्रत्येक जिल्ह्यात नियोजित केलेल्या पक्षाच्या विविध कार्यक्रमासंदर्भात आज *जळगांव ग्रामीण भाजपा* पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. 

सदर बैठकीत आगामी नियोजित लोकसभा प्रवास कार्यक्रम, परीक्षा पे चर्चा, जी२० शिखर परिषद इ. कार्यक्रमासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या व नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन,जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, यांच्यासह श्रीमती स्मिता वाघ, मधुकर काटे, नंदकिशोर महाजन, पोपटतात्या भोळे, पी.सी.आबा पाटील, हिरालाल चौधरी, प्रल्हाद पाटील, डी.एस.चव्हाण, अजय भोळे, श्रीकांत महाजन, भरत महाजन, श्रीमती कांचन फालक, श्रीमती रेखा पाटील, श्री.सचिन पानपाटील यांच्यासह भाजपा जिल्हा व तालुका प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...