वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीच्या वतीने दिवाणी न्यायाधीश कु.रुणाली दयानंद पवार यांचा सत्कार !
मुंबई उपनगर, (शांताराम गुंडेकर) :
वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे संस्थापक/अध्यक्ष मा. डॉ. अविनाश संकुडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ (WHRAF) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, महिला महाराष्ट्र अध्यक्षा सौ.अनिता घोष यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या खंबाळा गावची लेक कु. रुणाली दयानंद पवार या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश बनल्या आहेत. या आगरी समाजातून पहिल्या महिला दिवाणी न्यायाधीश पदाची परीक्षा महाराष्ट्रात ८ वा क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाल्या त्यांच्या या उत्तुंग यशा बद्दल देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ. व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित आले त्याप्रसंगी AIACPC चे महाराष्ट्र सचिव श्री.अमित देशमुख, ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री. ऋतुकांचन रसाळ, ठाणे सचिव श्री.सचिन जोइजोडे, मुंबई सहसचिव श्री. हितेश गायकवाड, श्री. लीतेश केरकर, WHRAF चे मुंबई सहसचिव श्री.हेमंत नाईक, मी वाघीण व रिक्षा सेना ग्रुप संस्थापक अध्यक्ष सौ. आशा रसाळ, कु.प्राप्ती रसाळ व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment