कोकणचे सुपुत्र शाहीर तुषार पंदेरे ऑनलाईन शक्ती -तुरा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ प्रस्तुत कुणबी युवक आयोजित ऑनलाईन संगीतमय गीत गायन स्पर्धा - २०२२ पार पडली होती. या शक्ती- तुरा गीत गायन स्पर्धेचा स्नमा. अध्यक्ष रवी बावकर यांनी अंतिम निकाल नुकताच जाहिर केला. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील केळवली गावाचे सुपुत्र मुंबई येथे वास्तव्यास असलेले शाहीर श्री.तुषार म. पंदेरे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यावर शाहीर तुषार पंदेरे यांनी यनिमित्ताने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, याचं श्रेय जातं ते प्रथम ज्यांनी या लोककला शाहिरीचे ज्ञान दिले ते म्हणजे माझे मोठे चुलते गुरुवर्य शाहीर शंकर पंदेरे, शिवराम पंदेरे, तुकाराम पंदेरे, आणि वस्ताद लोकशाहीर मधुकर पंदेरे बाबा आणि या माझ्या पंदेरे परिवाराला शाहिरी काव्य लेखणीचा वसा ज्यांच्या मुळे लाभला ते आपले आदर स्थान शीघ्र कवी वासुवाणी मुंगळे यांच्या आशीर्वादाने शक्य झाले. तसेच मी ३० वर्ष या लोककलेचा पाईक शाहीर म्हणून कार्यरत आहे.पणं शक्ती- तुरा शाहिरी स्पर्धेत कधी भाग घेतला नाही व तशी संधी पण आली नाही. पण या स्पर्धेत भाग घेतला. यासाठी मोठी साथ लाभली ते म्हणजे ज्यांनी या शक्ती तुरा शाहिरी मध्ये नावारूपाला आणले ते शाहीर झराजी वीर व कळझोंडी ग्रामस्थ व माझा भाऊ समान उत्कृष्ट ढोलकी पटु सुरेश वीर आणि कीबोर्ड मास्टर सतिश मोहिते यानी या गाण्याना उत्तम संगीत साथ दिली, तसेच कोरसला जुने साथीदार श्याम वीर आणि शिष्य गायक संदेश पाते आणि इतर सहकारी यांचे. त्यामुळे या ऑनलाईन स्पर्धेत हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशीच साथ कायम मिळत राहो अशी रंगदेवते चरणी प्रार्थन करतो. तसेच आयोजक, स्पर्धा परीक्षक व अन्य पदाधिकारी यांचे यनिमित्ताने मनःपूर्वक धन्यवाद शाहीर तुषार मधुकर पंदेरे यांनी व्यक्त केले आहेत. शाहीर तुषार पंदेरे यांचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांना कोकणातील अनेक शाहीर, कवी, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार, शक्ती -तुरा, नमन आयोजक यांनी अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment