महराष्ट्रात राज्यपाल बदलाचे वारे, नवे राज्यपाल अमरिंदर सिंघ होण्याची शक्यता !
भिवंडी, दि,२७, अरुण पाटील (कोपर) :
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवले जाण्याची चर्चा सध्या महाराष्ट्रापासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरच राज्यामध्ये राज्यपाल बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरच राज्यामध्ये राज्यपाल बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली होती.
हिवाळी अधिवेशनातही राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलने केली. त्यानंतर राज्यपाल बदलले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कोश्यारी यांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवले जाण्याची चर्चा आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे जवळपास नऊ वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.
अमरिंदर सिंग त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती केली होती. मात्र या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आले होते. काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर अमरिंदर सिंग हे भारतीय जनता पक्षात जातील अशा चर्चादेखील त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र अमरिंदर सिंग यांनी आपला स्वतःचा पक्ष काढून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करून टाकला होता.
१९४२ साली पंजाबच्या पटियाला शहरात अमरिंदर सिंग यांचा जन्म झाला होता. 1963 साली त्यांनी भारतीय आर्मी जॉईन केली होती. 1965 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग होता. अमरिंदर सिंग यांनी आपल्या राजकीय काँग्रेस पक्षासोबत काम केले आहे. त्यांच्या 52 वर्षाच्या राजकीय प्रवासात त्यांनी काँग्रेसमध्ये 42 वर्ष काम केले. यामध्ये ते दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. १९७७ ला त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम करायला सुरुवात केली त्यावेळी ते लोकसभेवर पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते.
ॲापरेशन ब्लू स्टार नंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. १९९८ साली त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोबत काम करायला सुरुवात केली. १९९ ते २००२ या काळात ते पंजाब काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अरुण जेटली यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१० ते २०१३ आणि २०१५ ते २०१७ ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. २००२ ते २००७साली त्यांनी भारतीय जनता पक्ष, अकाली दल यांची सत्ता मोडत पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन केली होती.
२००७ साली ते पंजाबचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. तसेच २०१७ साली ते दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले.१८ सप्टेंबर २०२१ आली त्यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला होता. त्यांनतर त्यांनी स्वत:ता पक्ष स्थापन करीत पंजाब विधानसभा निवडणुक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे.
No comments:
Post a Comment