Monday, 2 January 2023

कोकण नगर रहिवाशी संघ, संलग्न युवा संघ विरार आयोजित नमन कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोकण नगर रहिवाशी संघ, संलग्न युवा संघ विरार आयोजित नमन कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद !

जनसेवेचा वसा उचलून गरजूना दिला मदतीचा हात...

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर/दीपक मांडवकर) :

           कोकण नगर रहिवाशी संघ संलग्न युवा संघाने कारगिल नगर विरार येथील या संघटनेने रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी नालासोपारा पूर्व मोरेगाव येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोज  केले. यात प्रामुख्याने दिनदर्शिका लोकार्पण सोहळा व विनोद फटकरे निर्मित बहुरंगी नमन या कार्यक्रमाचे आयोजन केले असता. प्रथम मान्यवर वसई विरार महानगरपालिका सभापती श्री प्रशांतिजी राऊत किशोरजिभेरे, मनोजजी राऊत व कोकण नगर र. स. चे अध्यक्ष श्री विनायक शिगवण उपस्थितीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व दिनदर्शिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या संघटनेने सिविध कार्यात आपले प्रतिमात्मक कार्य केले असून प्रामुख्याने विरार नगरातील कोकण वाशियाना एकत्रित करून प्रमुख गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा सहभाग घेतला. यात विभागातील ट्रान्सफॉर्मर, जलवाहीणीं, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आरोग्य शिबिर आयोजन, रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम, व कोरोना काळात खिचडी वाटप आणि पूरग्रस्त कोकणात सर्वात मोठी मदत करण्यात यांचा सर्वात मोठा हात असतो.

            मान्यवरांच्या वतीने खास करून सभापती श्री प्रशांत राऊतजी यांनी समुदायाला संबोधित करताना आमी सदैव आपल्या संघटने सोबत असून कधीही गरज भासल्यास आपण कोणतेही सहकार्य करू असे बोलून संघटनेला अकरा हजार रुपये मदत जाहीर केली. झालेल्या नमन कार्यक्रमाचा उद्देश म्हणून विभागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य करण्यासाठी असून सर्वात मोठी मदत करण्याचे जाहीर केले. तर मान्यवरांच्या वतीने या संघटनेचे खूप कौतुक करण्यात आले. व कार्यक्रमा साठी किमान आठसे जनसमुदाय जमला होता. शेवटी कोकण नगर रहिवासी संघ संलग्न युवा संघचे अध्यक्ष श्री. विनायक शिगवण यांनी सर्व मान्यवर व देणगीदार, महिला मंडळ आणि सर्व युवा कार्यकर्त्यांचे आभार मानले. व जमलेल्या राशिक प्रेक्षकांचे आभार मानून नालासोपारा येथे इतिहास घडविला म्हणून आभार मानले.  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुरेंद्र बोलले व निलेश ठोंबरे यांनी केले. आणि रशिक प्रेक्षकांनी विनोद फटकरे निर्मित बहुरंगी नमनाचा आनंद आनंद घेत कार्यक्रम आयोजकांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...