अन्वी (परी) मिलिंद चौधरी हिच्या ५व्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप...
पालघर/दि.१५
अन्वी माही मिलिंद चौधरी हिच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त आपले मानवाधिकार फाउंडेशन व सोशल मिशन सोसायटीच्या माध्यमातून आणि वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडा यांच्या सहकार्याने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्यानिमित्त जाणाऱ्या वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप ढोलेवाडी, ता.त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सकाळपासून आयोजित करण्यात आले होते.
'याची देही, याची डोळा' या संत शिकवणीतून जीवनाचे सार्थक करण्याची कला माही चौधरी यांनी आपल्या मुलीवर रुजवली आहे. संत संगत, संतांची सेवा, संतांची शिकवण हेच जीवनाचे अमृत आहे, असे परीच्या मनावर ठामपणे रुजवावे या हेतूने वाढदिवसाचे औचित्य साधत आज रोजी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील पायी वारी करत जाणाऱ्या सर्व वारकरी भक्तांची सेवा करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही जिल्ह्यातून जवळपास 50 दिंडी आणि हजारो वारकरी या दिंडी मध्ये सहभागी होऊन 150 ते 200 किमी चा घाट असलेला प्रवास पायी करत असतात. ऊन, वारा, थंडी यांचा सामना जंगली भागातून करत असताना वारकऱ्यांना असंख्य आरोग्याच्या अडचणींवर मात करावी लागते. याकरिता आपले मानवाधिकार फाउंडेशन व सोशल मिशन सोसायटीच्या माध्यमातून आणि वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडा यांच्या विशेष सहकार्याने शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी परिसरात असणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वही, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संविधान व्याख्याते डॉ.दिपेश पष्टे, भारतीय कामगार सेनेचे मिलिंद चौधरी, आपले मानवाधिकार चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेश पष्टे, राज्य अध्यक्ष गणेश उमराठकर, मोखाडा तालुका अध्यक्ष भाऊ वैजल, माही चौधरी, कल्पेश पष्टे, वाडा हॉस्पिटल चे डॉ.अमित शर्मा आणि सहकारी, शाळेतील शिक्षक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि दिंडी आयोजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment