कल्याण पंचायत समितीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आद्यशिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कल्याण पंचायत समितीच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
प्रथम कल्याण पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागासह कक्ष अधिकारी, प्रशासन, आदी विभागातील महिलांनी स्त्री शिक्षणांच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यानंतर कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली, ते म्हणाले, अंत्यत कठीण काळात सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले, जमीनीची पाटी व लाखडाच्या काठीची पेन्सिल करून महात्मा जोतिबा फुले
यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरे घिरवली,पुणे येथील भिडे वाढ्यात मुलींची शाळा सुरू केली, त्याकाळी सनातनी लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. पण तो मोढून त्या शिकल्या,प्लेगच्या साथीत सगळे पुणे सोडून गेले परंतु फुले दांपत्याने रुग्णांची सेवा केली. त्यांच्या च पुण्य ईमुळे आज या महिला काम करत आहेत. प्रत्येक महिलांनी त्यांचे काम आठवून त्याप्रती प्रामाणिक राहिले पाहिजे. त्याच्या पवित्र अशा भिडेवाड्याची दयनीय अवस्था झाली आहे हे पाहून वाईट वाटते असेही ते म्हणाले,
या कार्यक्रमास विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण, श्री हरड,एस एस संत,श्रीमती मोटघरे मँडम, बालविकास विभागाच्या विस्तार अधिकारी, मुख्य सेविका, कक्ष अधिकारी, प्रशासन विभागाच्या महिला, ग्रामसेवक ,शिपाई आदी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment