Sunday 26 February 2023

गलवाडा ग्रामपचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पोलीस बंदोबस्तात पारित; सात विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव मंजूर !

गलवाडा ग्रामपचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पोलीस बंदोबस्तात पारित; सात विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव मंजूर !

गलवाडा ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव पारित झाल्यावर  सदस्य 

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.१६... गलवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पंजाबराव कुणगर यांच्या विरोधात नऊ पैकी सात विरुद्ध दोन असा अविश्वास ठराव पारित झाला आहे. ग्रामपंचायत सभागृहात मंगळवारी (दि.२१) दाखल झालेल्या ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. अखेर अविश्वास ठराव दाखल केलेल्या सहा सदस्यांच्या मागणीवर एकमत न झाल्याने अखेर अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पिठासन अधिकारी रमेश जसवंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले यावेळी ठरावाच्या बाजूने सात जणांनी तर ठरावाच्या विरोधात दोघांनी मतदान केले, त्यामुळे सात विरुद्ध दोन असा सरपंच पंजाबराव कुनगर यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित होऊन मंजूर झाला आहे. यावेळी सभागृहात नऊचे नऊ सदस्य उपस्थित होते.

                              पोलीस बंदोबस्त

गलवाडा ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी दिलेल्या अविश्वास ठरावात सात मुद्दे नमूद केले होते यामध्ये सरपंच पंजाबराव कुणगर हे सदस्यांना विश्वासात न घेता विकासकामे करतात, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहून सदस्यांचे काही एक म्हणणे ऐकून घेत नाही गावाच्या स्वच्छते बाबत उदासीन राहून ग्रामपाणी पुरवठा बाबत कोणताही निर्णय घेत नाही तसेच मासिक बैठकीत गैरहजर राहतात अशा सात मागण्या मुळे नाराज होवून सहा सदस्यांनी गुरुवारी सोयगाव तहसिल कार्यालयात अविश्वास ठराव  दाखल केला होता.

----- यावेळी सभागृहात सरपंच पंजाबराव कुनगर, उपसरपंच मंगलाबाई बिरारे, सुशिलाबाई इंगळे, दीपाली औरंगे, फिरोज उस्मान पठाण, रवींद्र जगताप, आसमाँ हुसेनखा पठाण, सखुबाई इंगळे ,मधुकर इंगळे आदी सदस्य उपस्थित होते. याकामी अध्यासी अधिकारी रमेश जसवंत, मंडळ अधिकारी मारोती धोंडकर, आशिष औटी, ग्रामसेवक गणेश गवळी,प्रेम राजपूत, यांनी कामकाज पाहिले.

---पोलीस बंदोबस्तात गलवाडा ग्रामपंचायत च्या सभागृहात मंगळवारी अविश्वास ठरावाची प्रक्रिया राबविण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार, रवींद्र तायडे, गणेश रोकडे, राजू बर्डे आदींनी बंदोबस्त ठेवला होता...

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...