राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात करमाड येथे काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने !
करमाड , अखलाख देशमुख, दि २५ : न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी सिद्ध केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यामुळे काँग्रेसच्यावतीने करमाड येथे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निदर्शने पार पडली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात शनिवारी सकाळी करमाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दोन तास जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार हिटलरशाही पद्धतीने सरकार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही संतुष्टात आणून हुकूमशाही पद्धतीने केंद्र सरकार जनतेवर अन्याय करत आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ "राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, कृउबाचे माझी सभापती संजय औताडे, जाहीर शेख, करमाडचे माजी सरपंच कैलास उकर्डे, पंचायत समितीचे माजी सभापती मनोज शेजुळ, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष शेजुळ, श्यामबाबा गावंडे, जी.प. सदस्य सुरेश शिंदे, भगवान मते, दत्तू तारो, गजानन मते, विठ्ठल कोरडे, भगवान मुळे, रवी करमाडकर, रमेश कुलकर्णी, दत्तू ठोंबरे, श्याम पोफळे, कल्याण पोफळे, गणेश चौधरी, संजय पळसकर , अमोल काकडे, विजय पोफळे, सोमीनाथ पोफळे, मोहम्मद शेख, जानिभाई शहा, कैलास शिंदे , योगेश घावटे, बबन पोफळे, संजय पळसकर, जगदीश डवले, सावता गाडेकर, कल्याण गाडेकर, अमोल मोरे , ज्ञानेश्वर दांडगे , रंगनाथ उकर्डे, रामकिसन कुबेर, आप्पाराव भावले, काका इत्थर यांच्यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment