कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नगर जिल्ह्यातिल नुकसानीची पाहाणी !
अहमदनगर, अखलाख देशमुख, दि २४ : कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आज नगर जिल्ह्यातील नांदूर खुर्द व खंडाळा ता. रहाता येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेसह कांदा, मका पिकाची पाहणी केली.
राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी धीर धरावा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे लवकरच निर्णय जाहीर करतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, कृषि सह संचालक रफिक नाईकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्यासह कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment