Tuesday, 28 March 2023

पक्षाने निर्देश दिलेल्या कार्यक्रमास गैरहजर राहणार्‍या पदाधिकार्‍यांवर होणार कारवाई !

पक्षाने निर्देश दिलेल्या कार्यक्रमास गैरहजर राहणार्‍या पदाधिकार्‍यांवर होणार कारवाई !

मुंबई, अखलाख देशमुख : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, प्रश्न तसेच राजकीय मुद्द्यांवर विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण अथवा सत्याग्रह असे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले जात असतात. पक्षीय कार्यक्रम असो वा जनतेच्या समस्यांसाठी घेतलेला कार्यक्रम असो जिल्हास्तरावर सर्वच सन्माननीय पक्ष पदाधिकारी यांनी स्वतः सहभागी होत आपल्याबरोबर इतर कार्यकर्ते यांचा सहभागही जास्तीत जास्त संख्येने करणे अपेक्षित आहे. परंतु प्रदेश काँग्रेसच्या असे लक्षात आले आहे की, अनेक पदाधिकारी अशा पद्धतीच्या आंदोलन, मोर्चात सहभागी होत नाहीत, हा प्रकार चिंताजनक आहे. यासंदर्भात मा. प्रांताध्यक्ष महोदयांनी दि. २६ मार्च रोजीच्या झूम मीटिंग मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले पाहिजे. पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार त्याचे उचित पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रदेश / जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेऊनही पक्षाचे काम करत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणार्‍या पदाधिकार्‍यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांची असेल. प्रदेश स्तरावरून दिलेल्या कार्यक्रमाची माहिती सर्व सन्मा. नेते, आजी माजी खासदार / आमदार, प्रदेश / जिल्हा व ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी, आघाडी संघटना- विभाग व सेलचे पदाधिकारी यांच्यासह सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांना देण्याची खबरदारी जिल्हा काँग्रेस कमिटीने घ्यावी.

प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की, यापुढे होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात अथवा मोर्च्यात प्रदेश पदाधिकार्‍यांनी किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी २० तर ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी यांनी १० कार्यकर्ते सोबत आणावे. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार आपल्या सोबत कार्यकर्ते आणणार नाही अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने देण्यात यावी, जेणे करून अशा पदाधिकार्‍यांवर उचित कार्यवाही करता येईल.

No comments:

Post a Comment

गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न !!

गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न !! ....*राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील "भादाणे गावातील जिल्हा परिषद...