Tuesday, 28 March 2023

ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, मुरबाड व उल्हासनगर बाजार समितीची निवडणूक जाहीर, भाजपाच्या गटबाजीचा महाविकास आघाडी फायदा घेणार ?

ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, मुरबाड व उल्हासनगर बाजार समितीची निवडणूक जाहीर, भाजपाच्या गटबाजीचा महाविकास आघाडी फायदा घेणार ?

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भिंवडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यातील उल्हासनगर या चार बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम सहकार विभागाने जाहीर केला असून यामध्ये भाजपा मधील उघड गटबाजी आणि शिवसेना शिंदे गटाविरोधातील शिवसैनिक व लोकांच्या असंतोषाचा फायदा महाविकास आघाडी या निवडणुकीत घेणार का? की या उलट होते हे लवकरच कळणार आहे.

जिल्ह्यातील या ४ बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. २७ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रांरभ झाल्याने इच्छुक उमेदवाराची धावपळ उडाली आहे. या चार बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सेवा सोसायटी मधून ११ संचालक निवडले जाणार आहेत. यामध्ये ७ सर्वसाधारण, २ महिला प्रतिनिधी, १ इतर मागास समाजातील आणि १ अनुसूचित जमाती मधील प्रतिनिधीचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत सदस्यांमधून ४ प्रतिनिधी मध्ये १ महिला, २ सर्वसाधारण आणि १ अनुसूचित जातीचे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. याशिवाय व्यापारी वर्गातून २व हमाल तोलाई मधून १ असे संचालक निवडून दिले जाणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या चार समितीच्या निवडणुकीत मतदारांचा विचार केला तर भिंवडी बाजार समितीत ग्रामपंचायत ११३८ ,सेवा सोसायटी ३३८, व्यापारी १०३, आणि हमाल तोलाई ४८ असे मतदार आहेत, शहापूर, ग्रामपंचायत ९०५, सेवा ७८५, व्यापारी २९८ आणि हमाल तोलाई ९, उल्हासनगर ७२७ आणि शेवटी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण मतदार १९७८ असून यामध्ये ग्रामपंचायत ९८७, सेवा सोसायटी ८४४, व्यापारी १३८ व हमाल तोलाई ९ असे मतदार संचालक निवडणार आहेत.

बाजार समित्या या तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणाचा पाया मानला जातो. शेतकरी व सामान्य नागरिकांपर्यंत संपर्क साधण्याचे हे महत्त्वाचे साधन आहे. 

त्यामुळे या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट व महाविकास आघाडी अश्या सर्वच पक्षांनी जोरात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. असे असले तरी भाजपामध्ये खासदार आमदारांमधील गटबाजी जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. शिवाय राज्यात शिंदे गटाने केलेले राजकारण हे कडवट शिवसैनिक व सर्व सामान्य जनता, शेतकरी यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांचा शिंदे फडणवीस सरकारवर भयानक संताप आहे. याचा महाविकास आघाडी फायदा घेणार का?

तसेच बाजार समितीमध्ये १८ सदस्य निवडून द्यायचे आहेत आणि प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी संख्या पाहता बंडखोरांची लागण सर्वांना डोकदूखी ठरणार आहे. त्यामुळे हे बंडोबा कसे थंड होतात यावरही यश अपयश अवलंबून आहे.

प्रतिक्रिया..
भरत गोंधळे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे ग्रामीण) - सध्या राज्यात शिंदे फडणवीस सरकार विरोधात जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे, तरीही आम्ही शिवसेना ठाकरेगट, काँग्रेस व मित्र पक्ष अश्या सर्वाच्या भेटीसाठी, चर्चा करून भाजपाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेपासून दूर ठेऊ.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...