Saturday, 25 March 2023

कल्याण तालुक्यात लोकशाहीचा गळा घोटणा-या मोदी सरकारचा निषेध, भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी !

कल्याण तालुक्यात लोकशाहीचा गळा घोटणा-या मोदी सरकारचा निषेध, भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी !

कल्याण, (संजय कांबळे) : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी याची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात कल्याण तालुक्यातील गोवेली येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला, यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. याचा निषेध करण्यासाठी कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी  निषेधमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव, माधुरी वाळिंबे, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, शैलेश अधिकारी, जिल्हाध्यक्ष स्वंयमरोजगार विभाग, अमोल सुरोशी, अध्यक्ष, युवक काँग्रेस, बंडू डोंगरे, शिवसेना संपर्क संघटक, संतोष सुरोशी, सुनील शिर्के, उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, जगदीश धुमाळ, रोहिदास पवार, कैलास पवार, कुंडलीक गायकर, भास्कर टेंभे, शाखाप्रमुख रायते, आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  काँग्रेस कमिटीचे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हे लोकशाहीचा गळा घोटत आहे, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, भारत जोडो यात्रेत हे सिध्द झाले आहे. त्यामुळे भाजपावाल्याचा थयथयाट सुरू आहे, या शिवाय वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, उद्योग पळविणे, शेतकरी आत्महत्या, न मिळणारी नुकसान भरपाई यावरुन लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधी यांच्या वर सुडबुध्दीने कारवाई करून त्यांची खासदारकी घाईघाईने रद्द करण्यात आली. परंतु मोदी सरकारला माहिती नाही की,नेते राहुल गांधी हे केंव्हाच जनतेच्या हद् य सिंहासनावर आरुढ झाले आहेत.

तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव यांनी मोदी सरकार, चले जाव चा नारा दिला, देश हुकूमशाही कडे वाटचाल करीत आहेत, याचा जनतेने विचार करून, सविधांन वाचवण्यासाठी येत्या २०२४ च्या निवडणुकीत या सरकारला गाढून टाका असे अवाहन त्यांनी यावेळी केले. आणि राहुल गांधी यांच्या वर केलेल्या कारवाई चा निषेध नोंदविला.

यानंतर काँग्रेस स्वंयमरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष शैलेश अधिकारी यांनी ही भाषण करून मोदी सरकारचा निषेध केला.

याप्रसंगी राहुल गांधी जिंदाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय, मोदी सरकार हाय, हाय, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !! कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६) कल्याण डोंबिवली...