Sunday, 26 March 2023

सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते उद्घाटन !

सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते उद्घाटन !

            औरंगाबाद, दि २६ : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची  जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे.  या चित्ररथाला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज हिरवी झेंडी दाखवली. यावेळी सहायक आयुक्त पांडूरंग वाबळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.

            सामाजिक न्याय विभाग अनेक लोककल्याणकारी योजना राबवित असते. या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले. 

या चित्ररथासोबत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका आणि पॅम्पलेटचे वाटप करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण.... नालासोपारा ता १४ :- नालासोपा...