हुकुमशाही मोदी सरकार विरोधात औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : आज दिनांक २६/०३/२०२३ रोजी राष्ट्रपिता महत्मा गांधी यांच्या पुतळया समोर शहागंज येथे सकाळी १० वाजता केंद्रीय हुकूमशाही सरकार विरोधात व आमच्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेते सम्माननीय खा. राहूलजी गांधी यांना संसदेतुन आठ वर्षासाठी निलंबीत करण्यात आलेले आहे. या हुकुमशाही सरकार विरोधात औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रहाचा कार्यव्रâम घेण्यात आला.
या सत्याग्रह कार्यकमाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. या प्रसंगी विरोधी पक्ष नेता अंबदास दानवे, मा. खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींचे मोदी सरकारच्या विरोधात भाषणे झाली.
विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी केद्र सरकार वर जोरदार हल्ला केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये जे कोणी मोदी सरकारच्या विरोधात बोलेल त्याचा आजवा दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे असा आरोप केद्र सरकार वर केला.
यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ, प्रा. एम.एम. देसरडा, कामगार पक्षाचे सुभाष लोमटे यांनी या सत्याग्रहाला पाठीबा दिला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री अनिल पटेल, एकबाल सिंग गिल, किरण पाटील डोणगांवकर, अॅड.सय्यद अक्रम, डॉ.पवन डोंगरे, युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष सागर नागरे,वरुण पाथ्रीकर, निलेश अंबेवाडीकर, शेख अथर, जयप्रकाश नन्नावरे, अरुण शिरसाठ, महिला शहर अध्यक्षा दिपाली मिसाळ, संतोष भिंगारे, उमाकांत खोतकर, मोहित जाधव कैसर बाबा, सरोज मसलगे, सुरेखा पानखडे, ॲड सुनिता तायडे, मदनकाका सातपुते, हेमा पाटील, अनिता भंडारी, शिला मगरे, रुबीना सय्यद, सिमा थोरात, बाबासाहेब पवार, शिवा गवळे, अलंकृत येवतेकर, मंजु लोखंडे, सिंधुताई पवार, शिवा गवळी, सय्यद फैयाजोददीन, सलीम खान, मुददसिर अन्सारी, श्रीकृष्ण काकडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment