Tuesday, 4 April 2023

पालकमंत्री ना. पाटील यांच्याहस्ते "ABC- अ बजेट चॅट" या ई-पुस्तकाचे विमोचन !

पालकमंत्री ना. पाटील यांच्याहस्ते "ABC- अ बजेट चॅट" या ई-पुस्तकाचे विमोचन !

*लेखक सीए. हितेश आगीवाल व सीए. अमृता मणियार यांना शाबासकी देत केले कौतुक*

जळगाव, अखलाख देशमुख, दि. ३ एप्रिल २०२३-
आज पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्याहस्ते "ABC- अ बजेट चॅट" या ई-पुस्तकाचे विमोचन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी ना. पाटील यांनी लेखकांना शुभेच्छा देताना सांगितले की "ABC - अ बजेट चॅट" या ई-पुस्तक द्वारे देशाच्या आर्थिक गती व प्रगती चे लोकांना मार्गदर्शन करण्याचा एक सुंदर प्रयोग सीए. हितेश आगीवाल व सीए. अमृता मणियार यांनी केला आहे या पुस्तकात आर्थिक नियोजनाच्या सर्वबाबी सुटसुटीत मांडल्या आहे तसेच आपला देश कशी प्रगती करतोय, आपल्या राज्याची आर्थिक व्यवस्था कशी आहे आणि आपण सर्वांनी काय अचूक नियोजन केले पाहिजे या सर्व सूचना सुसंगतपणे मांडण्याचे काम दोन्ही लेखकांनी केले आहे.

तसेच प्रास्ताविकात जळगाव जिल्हा शेतकरी तक्रार निवारण समितीचे सीए. हितेश आगीवाल यांनी सांगितले की देशाचा अमृत काल अर्थसंकल्प हा "सप्तर्षी" संकल्पनेवर आधारित असून यात ७ मुख्य प्राधान्य देत आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा सामान्य जनता, शेतकरी व महिला वर्गाचा विचार करून "पंचामृत" अर्थसंकल्प मांडला आहे. सरकारच्या उत्कृष्ठ कार्यासाठी मंत्रीमहोदय यांचे आभार मानून अभिनंदन करण्यात आले. तसेच सीए. अमृता मणियार यांनी आभार मानले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख मागासवर्गीय सेना मुकुंद नन्नवरे, जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, आरोग्यसेवक सागर पाटील, नवलसिंहराजे पाटील, वैभव निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...