संकल्प संस्थांच्या कार्यकर्त्या सीमा परीहार यांना महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३ सन्मानित !
मुंबई, अश्विनी निवाते :
नुकतीच मराठी पत्रकार संघ मुंबई या ठिकाणी जय महाराष्ट्र पत्रकार व वृत्तपत्र लेखन व कवी महासंघ आयोजित महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळेस महाराष्ट्रा मधील सामाजिक कार्य करण्याऱ्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
*संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे सर* यांच्या विशेष प्रयत्नाने आमच्या संस्थेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या *श्रीमती. सीमा परिहार यांचे नामांकन करण्यात आले होते.*
सीमा या गेली ५ वर्षा पासून मुंबईतील वेश्यावस्तीतील वेश्या व्यवसाय करीत असलेल्या महिलांचा पुनर्विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करीत आहे. नियमित त्यांची आरोग्य तपासणी करणे. त्यांच्या डॉक्युमेंटेशन तयार करून सरकारी योजना चा लाभ मिळवून देणे.एच आय व्ही बाधित व्यक्तीचे समुपदेशक करणे अशा महत्वाच्या कामगिरी बद्दल *महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३* पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज संभाजीराव जाधवराव, कै. शिवाजीराव देशमुख प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. चारुशीला देशमुख, मराठी सिने आणि नाट्य अभिनेत्री अमृता उत्तरवार संकल्प संस्था चे अध्यक्ष विनोद हिवाळे सर आणि कार्यक्रमाचे आयोजक सुरज भोईर सर आदी मान्यवर उपस्थित होते.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार कवी गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
*सीमा यांना प्रोत्साहन आणि अभिनंदन करण्यासाठी विशेष उपस्थिती कपिल क्षिरसागर, सविता हेंडवे, वनिता सावंत, शकीला तांबोळी, अश्विनी निवाते हे उपस्थित होते.*
निवड समितीचे मनपूर्वक मनःपूर्वक आभार तसेच सीमा त्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा....
No comments:
Post a Comment