Tuesday, 4 April 2023

भगवान महावीर जयंती शोभा यात्रेत कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती !

भगवान महावीर जयंती शोभा यात्रेत कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती ! 

सिल्लोड, अखलाख देशमुख‌, दि ४ : भगवान महावीर जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे आज सिल्लोड शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेत कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शहरातील भगवान महावीर स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधून भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

        यावेळी न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल,  कुणाल सहारे, भगवान महावीर  जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी अनिल बोरा, राजुसेट खिवंसरा , अनिल गोलेच्छा, मयूर सकलेचा, गौरव कासलीवाल,  डॉ. झलवार, सुनील पगारिया, गौरव सहारे, राध्येशाम गट्टानी, संजय पांडे आदिंसह सकल जैन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

ठाणे जिल्हयातील चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली हा दोन नॅशनल हायवेनां व औद्योगिक क्षेत्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्या...