Monday, 3 April 2023

चिपळूण तालुक्यातील कळंबट गावचे कोकण सुपुत्र श्री. निलेश कोकमकर यांना समता मानव सेवा संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातून "आदर्श समाजसेवक -२०२३" पुरस्कार जाहीर !

चिपळूण तालुक्यातील कळंबट गावचे कोकण सुपुत्र श्री. निलेश कोकमकर यांना समता मानव सेवा संस्थेच्या वतीने  महाराष्ट्रातून "आदर्श समाजसेवक -२०२३" पुरस्कार जाहीर !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समता मानव सेवा संस्थेच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती निमित्त ११ एप्रिल २०२३ रोजी वर्तक नगर येथे संस्थेचा ७ वा  वर्धापन दिन सोहळा निमित्त वार्षिकांक व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि आयोजक पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. स्वतःचे आयुष्य जगत असताना सामाजिक जबाबदारीच्या बांधिलकीतून उल्लेखनीय समाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होणे, त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे या उद्देशाने सन -२०२३ चे पुरस्कार संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. 
      या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून आदर्श डॉक्टर तज्ञ, आदर्श समाजसेवक आदर्श पत्रकार,आदर्श शिक्षक, दक्ष नागरिक, पर्यावरण मित्र, क्रीडा विभाग, आदर्श संस्था, आदर्श कलावंत, आदर्श विद्यार्थी अशा प्रत्येक क्षेत्रातुन व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील चिपळूण तालुक्यातील कळंबट गावातील सुपुत्र ज्यांना शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड असणारे,आज पर्यंत कोणत्याच प्रसिद्धीच्या झोतात न येता आपले समाजकार्य करणारे आणि त्याच प्रमाणे प्रत्येकासोबत सामाजिक बांधीलकी जोपासवणारे व्यक्तिमत्व श्री.निलेश महादेव कोकमकर (पत्रकार /सामाजिक कार्यकर्ते ) यांना  आदर्श समाजेवक- २०२३ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
             समाजातल्या  सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, संकटसमयी त्यांना आवश्यक ते सहकार्य, मदत करण्यासाठी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सहकार्य करणे, त्यांच्या प्रत्येक सुखं दुःखात सहभागी होतो. त्या व्यक्तीस सामाजिक कार्यकर्ता, समाज सेवक म्हणून ओळखले जाते. आणि त्यातूनच समाज कार्याची ओळख निर्माण होते. पैसा आहे तरच समाज कार्य करता येते असं नाही तर आपल्याकडील वेळ देऊन सुद्धा कार्य करता येणे म्हणजे समाजकार्य या व्याख्येने चालणारं , शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य  करणाऱ्यांमध्ये दडलेलं एक नाव ते म्हणजे कळंबट गावाचे सुपुत्र पत्रकार श्री.निलेश कोकमकर याचं आहे. त्यांना आदर्श समाजेवक- २०२३ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक सामाजिक संस्था, मंडळ, प्रतिष्ठान तसेच शक्ती -तुरा, नमन आणि कुणबी समाज मधील अनेक व्यक्ती, पदाधिकारी यांनी अभिनंदन सह यथोचित शुभेच्छा देत पुरस्कार जाहीर करणाऱ्या शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समता मानव सेवा संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...