Monday, 3 April 2023

एसटी महामंडळाचा गोंधळ व भोंगळ कारभार, एकाच प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट दर, अधिकृत हाँटेल थांब्याकडून प्रवाशांची लुट ? योजना कागदावर !

एसटी महामंडळाचा गोंधळ व भोंगळ कारभार, एकाच प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट दर, अधिकृत हाँटेल थांब्याकडून प्रवाशांची लुट ? योजना कागदावर !

कल्याण, (संजय कांबळे) : "प्रवाशांच्या सेवेसाठी, या ब्रीदवाक्याचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाचा गोंधळात गोंधळ सुरू असून एकाच प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात येत असून एसटीच्या मार्गावर जे अधिकृत हाँटेल थांबे आहेत, त्यांच्या कडून प्रवाशांची अक्षरशः लुट सुरू आहे. असे असताना शासन मात्र प्रवाशासाठी विविध प्रकारच्या योजना व सवलती दिल्याचे सांगत आहे. करोडो रुपयांच्या जाहिराती मधून स्वतः ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु खरेच या योजनांची अंमलबजावणी होते का? सवलतींचा लाभ मिळतो का? याचं काही देणघणं नसल्यामुळे या योजना केवळ कागदावरच सुसाट सुटल्या आहेत.

सन १९४८ मध्ये स्थापन झालेल्या एसटी महामंडळाच्या 'प्रवाशांच्या सेवेसाठी' या ब्रीदवाक्याने ती घराघरात पोहचली, लालपरी म्हणून तिला सर्वमान्यता मिळाली. एकेकाळी अगदी खेडोपाडी बस दिसत होती. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी पास, यासह विविध सवलती प्रवाशांना देण्यात आल्या होत्या. खाजगी वाहतुकीच्या अतिक्रमणानंतरही एस अद्यापही टिकून आहे. जवळपास १ लाख ५ह जार इतके कर्मचारी व १५ हजार ५१२ वाहने असणारी सर्वात मोठी वाहतूक संस्था म्हणून एसटी कडे पाहिले जाते. ३१ विभागातून कामकाज चालणाऱ्या एसटीला राजकारणाचा गंज पकडला व ती भंगारात जाऊ लागली.

सध्याच्या शासनाने खाजगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटीवर विविध प्रकारच्या योजना व सवलतींचा पाऊस पाडला, महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षावरील व्यक्ती ला मोफत प्रवास, एसटीच्या अधिकृत हाँटेल थांब्यावर ३० रुपयात चहा नास्ता योजना, आदी शेकडो योजना व सवलतींचा समावेश आहे. परंतु यांची प्रत्यक्षात अमंलबजावणी होते का? यातील अडचणी दूर झाल्या का?याबाबत मात्र गोंधळ व भोंगळ कारभार सुरू आहे.

राज्यात एसटीचे ५० अधिकृत हाँटेल थांबे आहेत. पण ३० रुपयात तिकीट दाखवून चहा व नास्ता ही योजना सुरू आहे हें ९० टक्के प्रवाशांना माहिती नाही, तसा फलक, किंवा बोर्ड कुठेही दर्शनी भागात लावलेला दिसून येते नाही, एवढेच नव्हे तर एसटीचे चालक वाहक हे देखील असें काही आहे हे सांगण्याची तसदी घेत नाहीत, क्वचितच काही हाँटेलात तो लावलेला असला तरी तो आतमध्ये असतो, तोपर्यंत प्रवासी काऊंटर वर पुर्ण पैसे देऊन खाद्यपदार्थ खरेदी करतात. तर अनेक हाँटेल थांब्यावर शेकडो बसेस थांबतात, पण त्यांच्या कडे ही योजना नसते, अशा ठिकाणी अव्वाच्या सव्वा किंमतीत खाद्यपदार्थ घ्यावे लागतात, याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो. यातून प्रवासी व हाँटेल मालक यांच्यात, भांडण, वादावादी, तक्रारी होतात.

हे कमी की काय म्हणून एकाच ठिकाणी जाण्यासाठी व तिकडून परत येण्यासाठी वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशाला कल्याण हून इस्लामपूर ला जाण्यासाठी ५०५ रुपये तिकीट दर आकारला गेला, आणि इस्लामपूरहून कल्याणला येण्यासाठी ५१५ रुपये घेण्यात आले. केवळ दोन दिवसांत १० रुपये कसे काय वाढले. असा गोंधळ व भोंगळ कारभार सध्या एसटी महामंडळ मध्ये सुरू आहे.

याशिवाय शासनाने शेकडो सवलती व योजनेची घोषणा केली, पण त्यासाठी पुरेशा बस आहेत का? आजही महाराष्ट्रात अनेक खेडोपाडी बस नाहीत, होत्या त्या बंद केल्या आहेत. अपु-या बसमुळे चेंगराचेंगरी, वादावादी, भांडण, मारामारी, वयोवृद्धांचे हाल, खिडकीतून आत घुसने, हे रोजच सुरू आहे. त्यामुळे शासनाने सवलती देताना सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी द्यायला हवी. अन्यथा या सर्व योजना कागदावर राहणार आहेत याचा शासनाने विचार करायला हवा.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...